Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमाल खान म्हणाला, तर माझ्या आत्महत्येला जबाबदार तुम्ही असाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:44 IST

कमाल आर. खान हा त्याच्या अभिनयापेक्षा जास्त त्याच्या विवादित ट्वीटला घेऊन चर्चेत राहिला आहे. कमाल खान आणि वाद हे ...

कमाल आर. खान हा त्याच्या अभिनयापेक्षा जास्त त्याच्या विवादित ट्वीटला घेऊन चर्चेत राहिला आहे. कमाल खान आणि वाद हे नातं तसे जुनेच आहे. आतापर्यंत त्याच्या अनेक ट्विट्स वरुन चांगलाच वाद रंगला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. आमिर खानचा चित्रपट सीक्रेट सुपरस्टारच्या क्लायमेक्स सीन्सची डिटेल्स रिव्हील केल्यामुळे कमाल खानच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे ट्वीटर अकाऊंट बंद करण्यात आल्याचे समजतेय.कमालने आता त्याचे ट्विटर अकाऊंट परत सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. कमालने या संदर्भात प्रेस रिलीज काढून ट्विटर इंडियाला धमकी दिली आहे की अकाऊंट पुन्हा सुरु करा नाही तर मी आत्महत्या करेन आणि त्याला कारणभूत तुम्ही असाल.  आपल्या या प्रेस रिलीजमध्ये कमालने लिहिले आहे, ''ट्विटर इंडियाचा स्टाफ मिस. महिमा कौल, वीरल जानी आणि तरनजीत सिंग यांना ट्विटर अकाऊंट रिस्टोर करण्याची विनंती केली आहे. आधी त्यांनी मला लाखों रुपयांचे दंडा लावला आणि मग अचानक माझे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले. त्यांनी माझ्यासोबत धोका दिला आहे. मी खूप चिंतेत आहे. जर त्यांनी माझे ट्विटर अकाऊंट रिस्टोर नाही केले तर मी आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार ही सगळी लोक असतील.'' आतापर्यंत अनेक कलाकारांबाबत के. आर. केने ट्वीट केले आहे.  कमाल खान स्वत: ला बॉलिवूडचा स्वयंघोषित क्रिटिक्स म्हणवतो. काही दिवसांपूर्वी त्यांने  करिना कपूरसोबतचा फोटो शेअर करत, करिना आपल्यासोबत 4 वर्ष रिलेशनशीपमध्ये होती असे ट्वीट केले होते. त्याआधी  त्यांने सनी देओल आणि डिंपल कपाडियाचा लंडन रस्त्यांवरच्या फोटोवरुन सुद्धा पंगा घेतला होता. याआधी केआरकेने पोस्टर बॉईजबाबत ट्वीट करुन श्रेयस तळपदे पंगा घेतला होता. श्रेयसने केआरला चांगलेच ट्वीटवर झापले होते. केआरला चांगलीच तंबी श्रेयसने दिली होती.