Join us

अभिनेत्री नसती झाली तर तापसी पन्नूला करायचे होते या फिल्डमध्ये करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:42 IST

अभिनेत्री तापसी पन्नूला खेळाबाबत विशेष प्रेम आहे. ऐवढेच नाही जर तापसी अभिनेत्री बनली नसती तर ती नक्कीच एक खेळाडू ...

अभिनेत्री तापसी पन्नूला खेळाबाबत विशेष प्रेम आहे. ऐवढेच नाही जर तापसी अभिनेत्री बनली नसती तर ती नक्कीच एक खेळाडू झाली असती. जुडवा 2 नंतर तापसी हॉकी पटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिसणार आहे. लवकरच तापसी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात ती स्वत: एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. तापसीने सांगितले की, ''मला खेळाबाबत विशेष प्रेम आहे आणि मला नहेमीच असे वाटते कि जर मी अभिनेत्री झाली नसते तर मी खेळाडू झाले असते. अभिनेत्रीचे आयुष्या ही मला जगायला आवडते कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळातात. शेवटी मला दोन्ही इच्छा पूर्ण करायची संधी या चित्रपटामुळे मिळाली.'' पुढे तापसी म्हणाली, ''मी हॉकी शिकण्यासाठी खूपच उत्साहित आहे.'' या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करतो आहे. तापसीला शालेय जीवनापासूनच खेळाची आवड आहे. लहानपणी तापसी खेळांमध्ये अग्रेसर असायची.शाळेत असताना तिला विविध स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायला आवडायचे.चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर अचानक तापसी मॉडेलिंगकडे वळली.ALSO READ :   सलग हिट चित्रपट देऊनसुद्धा तापसी पन्नूकडे नाहीत चित्रपट ?तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. पण तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. बेबी, पिंक या चित्रपटातील भूमिकींमुळे ती चांगलीच नावारूपाला आली. तापसीच्या जुडवा 2 चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला.  या चित्रपटात ती वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिसबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली होती.तसेच मध्यंतरी वरूण आणि त्याची ‘जुडवा2’ को-स्टार तापसी पन्नू या दोघांची जवळीक वाढल्याची बातमी होती. नताशा यामुळे अपसेट असल्याचेही ऐकीवात आले होते.