Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC World Cup : विराटची दमदार खेळी आणि भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर पतीसाठी अनुष्काची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:02 IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताच्या विजयाचे विराट आणि राहुल शिल्पकार ठरले. या सामन्यानंतर अनुष्काने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे,

आयसीसी वर्ल्डकप २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. रविवारी वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना अतिशय रोमहर्षक होता. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या एकामागोमाग एक विकेट पडल्याने भारत हा सामना जिंकेल का, याबाबत क्रिकेटप्रेमी साशंक होते. पण, विराट कोहली आणि के.एल.राहुल यांनी भारताला वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताच्या विजयाचे विराट आणि राहुल शिल्पकार ठरले. या सामन्यानंतर सोशल मीडियावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. के.एल. राहुलने या सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ११६ चेंडूत ८५ धावांची विक्रमी खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीनंतर विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराट आणि केएल राहुलचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने निळ्या रंगाचा हार्टही कॅप्शन म्हणून दिलं आहे. 

दरम्यान, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. विराट आणि अनुष्का पुन्हा आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनुष्का आणि विराटने  २०१७ साली लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनुष्काने जानेवारी २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला. दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चेवर अद्याप अनुष्का आणि विराटने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

टॅग्स :विराट कोहलीवन डे वर्ल्ड कपअनुष्का शर्मालोकेश राहुल