मी करणार ‘कुछ कुछ होता हैं’ अॅक्ट - वरूण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:06 IST
वरूण धवन हा पुढील महिन्याच्या फिल्मफेअरच्या कव्हरवर दिसणार आहे. कव्हरपेजच्या लाँचिंगसाठी तो एका सोहळ्यात गेला होता. त्यावेळी बोलतांना तो ...
मी करणार ‘कुछ कुछ होता हैं’ अॅक्ट - वरूण
वरूण धवन हा पुढील महिन्याच्या फिल्मफेअरच्या कव्हरवर दिसणार आहे. कव्हरपेजच्या लाँचिंगसाठी तो एका सोहळ्यात गेला होता. त्यावेळी बोलतांना तो म्हणाला,‘ मी लवकरच परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘कुछ कुछ होता हैं ’ अॅक्ट करणार आहे.आता याचा अर्थ ‘कुछ कुछ होता हैं’ चा रिमेक येणार आहे का? ते अद्याप त्याने सांगितलेले नाहीये. वरूणने नुकतेच ‘ढिशूम’ मध्ये परिणीतीसोबत हॉट रोमँटिक डान्स केला आहे. त्यांची केमिस्ट्री जानेमन आह मध्ये खुपच कुल दिसते.त्याचप्रमाणे वरूणची आलियासोबतही चांगली केमिस्ट्री जमते. वरूण-आलिया ‘स्टुडंट आॅफ द ईयर ’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ मध्ये एकत्र काम केले आहे.