Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते; रिया चक्रवर्तीने सगळाच 'हिशेब' दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 12:54 IST

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी पैसे उकळल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. त्यावर आता रियाने चुप्पी तोडली आहे आणि तिने सगळाच हिशोब दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी कधी ताब्यात घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण यापूर्वी रिया चक्रवर्तीने आज तकला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावरील आरोपांचा खुलासा केला आहे. सुशांतचे पैसे बळकावल्याचा सुशांतच्या वडिलांनी आरोप रियावर केला आहे. त्यावर तिने मी सुशांतच्या पैशांवर जगत नाही असे उत्तर दिले आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, रियाने सांगितले की इटली ट्रिपसाठी तिच्या भावाला सुशांतनेच आग्रह केला होता. त्याची कॅटची परीक्षा होती आणि तो कन्फ्यूज होता की माझी बहिण आणि तिचा बॉयफ्रेंड एकत्र आहेत तर मी का जाऊ, असे तिच्या भावाला वाटत होते. तिच्याकडे याचे चॅटदेखील आहेत.

इटली ट्रिपचा प्लान कसा बनला आणि खर्चाबाबत रियाने सांगितले की, पॅरिसमध्ये माझे एक शूट होते एका शियन नामक कंपनीसोबत. जी एक कपड्याची कंपनी आहे ज्याचा एक फॅशन शो होता. त्याचे चॅट माझ्याकडे आहेत. सर्व प्रुफ माझ्याकडे आहेत. तो फॅशन शो अटेंड करण्यासाठी मला पॅरिसला बोलवण्यात आले होते. माझे तिकिट बिझनेस क्लास आणि हॉटेलची तिकिटं बुक होती. पण सुशांतने विचार केला ही यात युरोप ट्रिप करूयात. त्याने ती तिकिटं रद्द केली. जी माझ्याकडे आहेत जर सिद्ध करावे लागले तर. त्याने ते तिकिटं कॅन्सल केली आणि फर्स्ट क्लासची तिकिटं बुक केली आणि इतर ट्रिपवरदेखील त्याने हॉटेलचे बिल भरले. त्याला असे करायचे होते आणि मला त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मला चिंता ही होती की खूप मोठी ट्रीप आहे. खूप जास्त पैसे खर्च होत आहेत. पण तो असाच किंग साइज जीवन जगत होता आणि हा मी सुशांत सिंग राजपूतच्या पैशांवर जगत नव्हती. आम्ही एका कपल सारखे राहत होतो.

   

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत