'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banvabanvi Movie) हा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला लोकप्रिय चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटात शंतनूच्या भूमिकेतून अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray) घराघरात पोहचला. तो व्ही शांताराम यांचा नातू आहे. त्याने बऱ्याच सिनेमात काम करून रसिकांच्या मनात घर केले. २००४ साली त्याने जगाचा निरोप घेतला. त्याची पत्नी शांतीप्रिया (Shanthipriya) देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अलिकडेच तिने नवऱ्याच्या आठवणीत स्वतःचं टक्कल करून सिद्धार्थचं ब्लेझर परिधान करुन फोटोशूट केलंय. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.
शांतीप्रियाने पती सिद्धार्थ रेच्या आठवणीत फोटोशूट केलंय. यात तिने स्वतःचं टक्कल केलंय आणि अभिनेत्याचं ब्लेझर परिधान करून फोटोशूट केलंय. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. याबद्दल ती सांगितले की, हल्लीच मी टक्कल केले आहे आणि याचा माझा अनुभव खूप चांगला आहे. एक स्त्री म्हणून आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा मर्यादा घालतो. नियमांचे पालन करतो आणि स्वतःला बंदिस्त ठेवतो. या परिवर्तनासोबत मी स्वतःला मुक्त केलंय. मर्यादेपासून स्वतःला मोकळं केलंय आणि यामागे जगाने आपल्यावर लादलेल्या सौंदर्य परिभाषा तोडण्याचा माझा उद्देश आहे आणि मी हे खूप धैर्याने आणि विश्वासाने करतेय.
दिवंगत पती सिद्धार्थ रेच्या आठवणीत ब्लेझर घातल्याचं शांतीप्रिया सांगते. ती पुढे म्हणाली की, आज मी माझ्या दिवंगत नवऱ्याच्या आठवणीत त्याचा ब्लेझर घातलाय. ज्यामध्ये अजूनही मला त्याची उब जाणवते.
वर्कफ्रंट
अभिनेत्री शांतीप्रिया हिने फुल और अंगार, सौंगंध , इक्के पे इक्का अशा अनेक हिंदी सिनेमात काम केलंय. हिंदीशिवाय तिने मल्याळम, तेलगू आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. तिला बॉलिवूडमध्ये तितके यश मिळाले नाही. यानंतर तिने १९९४ साली चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. ३१ वर्षांनंतर तिने तमीळ चित्रपटातून पुनरागमन केले.