भूमिकांमधील मी जिवंत रहावी - दीपिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 16:34 IST
कलाकार म्हटल्यावर त्याची एकच अपेक्षा असते ती म्हणजे आपली कला ही वर्षानुवर्षे नावाजली जावी. त्यासाठी ते प्रचंड मेहनतही घेतात. ...
भूमिकांमधील मी जिवंत रहावी - दीपिका
कलाकार म्हटल्यावर त्याची एकच अपेक्षा असते ती म्हणजे आपली कला ही वर्षानुवर्षे नावाजली जावी. त्यासाठी ते प्रचंड मेहनतही घेतात. अशीच काहीशी भावना दीपिका पादुकोण हिलाही निर्माण झाली आहे.ती म्हणते,‘ कलाकार म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की, माझ्या भूमिका या लोकांच्या वर्षानुवर्षे स्मरणात राहाव्यात. ‘ओम शांती ओम’,‘कॉकटेल’,‘रामलीला’,‘बाजीराव मस्तानी’,‘पिकू’ यातील माझे अभिनय खरंच मेहनतीने घडवलेले आहेत.एखादी स्क्रिप्ट मला आवडल्याशिवाय मी कधीच चित्रपट करण्यास तयार होत नाही. माझ्या प्रत्येक चित्रपटाचा शेवट हा आनंदी असतो. त्यामुळे प्रेक्षकवर्ग हा माझा चित्रपट पाहून दु:खी झालेला मला चालणार नाही.’