Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘आई’ राणी प्रथमच कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 10:59 IST

राणी मुखर्जी आई झाल्यापासून सोशल इव्हेंट्स, पार्टी, चित्रपटांपासून दूर आहे. मागच्या डिसेंबर महिन्यात तिने ‘अदिरा’ नावाच्या गोंडस मुलीला जन्म ...

राणी मुखर्जी आई झाल्यापासून सोशल इव्हेंट्स, पार्टी, चित्रपटांपासून दूर आहे. मागच्या डिसेंबर महिन्यात तिने ‘अदिरा’ नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला.बऱ्याच काळानंतर राणी एका कार्यक्रमात दिसली आणि ‘आई’ राणीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. आता राणी कशी दिसते असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे - ‘अतिशय सुंदर’!स्विट्झरलँडमध्ये प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक यश चोपडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी राणी तेथे गेली होती. यश चोपडा आणि स्विट्झरलँड हे नाते तर बॉलिवूडमध्ये सर्वांना ठाऊक आहे.‘सिलसिले’ ते ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ पर्यंत अनेक चित्रपटांचे शुटिंग त्यांनी ’पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या स्विट्झरलँडमध्ये केली आहे.चित्रपटांद्वारे देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या कामगीरीबद्दल सन्मान करण्यासाठी तेथील सरकारने यश चोपडांचा पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एवढा मोठ्या मानाच्या कार्यक्रमाला मोठी सून म्हणून राणीला उपस्थित राहावेच लागणार होते. यावेळी तिच्यासोबत यशजींच्या पत्नी व तिची सासू पॅमेला चोपडासुद्धा होत्या. राणी रुपेरी पडद्यावर कधी पुनरागमन करते याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. वुई मिस यू राणी आॅन बिग स्क्रीन!!