Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याच्यावेळी ‘हंगामा 2’ मधील शिल्पाचा नायक होता इतक्या वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:00 IST

हंगामा २ मध्ये ‘चुरा के दिल मेरा’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यातील नायक हा शिल्पापेक्षा खूपच लहान आहे.

ठळक मुद्देशिल्पा म्हणाली, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिचा सहकलाकार मिझान याचा जन्मदेखील झाला नव्हता. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे हे जेव्हा कळले तेव्हा त्याच्या एनर्जीसोबत मॅच करणे खूप कठीण असल्याची जाणीव मला झाली होती.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हजेरी लावणार आहे.

 ‘धडकन’ आणि ‘बाजीगर’ या सदाबहार बॉलिवूड चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या ‘हंगामा 2’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतीच तिने परेश रावल, प्रणिता सुभाष, मिझान जेफरी, राजपाल यादव आणि या चित्रपटाच्या इतर कलाकारांसोबत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ च्या सेटला भेट दिली. या कलाकारांनी द कपिल शर्मा शोच्या टीमसोबत प्रचंड मजा मस्ती केली. तसेच आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं सांगितली.

‘हंगामा 2’ या चित्रपटात शिल्पा पुन्हा एकदा ‘चुरा के दिल मेरा’ या तिच्या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. हे गाणे आधी शिल्पा आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. शिल्पा जितकी 25 वर्षांपूर्वी मोहक दिसत होती तशीच ती आजही मिझान जेफरीसोबत हे गाणे सादर करताना दिसत आहे अशी कपिलने शिल्पाची प्रशंसा केली. त्यावर शिल्पा म्हणाली, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिचा सहकलाकार मिझान याचा जन्मदेखील झाला नव्हता. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे हे जेव्हा कळले तेव्हा त्याच्या एनर्जीसोबत मॅच करणे खूप कठीण असल्याची जाणीव मला झाली होती. तरीही मिझान आणि विशेषतः परेश रावल यांच्यासोबत काम करायला मजा आली.

 मनोज जोशी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांनी कधीच नायकाची भूमिका साकारली नाही. नायकाची भूमिका साकारायला मिळाल्यास कोणत्या नायिकेसोबत काम करायला आवडेल असे विचारले असता मनोज यांनी या कार्यक्रमात सांगितले, “मी आयुष्यात कायम चरित्र अभिनेत्याच्या भूमिकाच साकारल्या. त्यामुळे मुख्य अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मला कधी मिळालीच नाही. एक संधी मिळाली तर एकदा तरी मला सगळ्या अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल.”

 

टॅग्स :शिल्पा शेट्टीद कपिल शर्मा शोकपिल शर्मा