Join us

'रियाला 2017ला भेटलो आणि सुशांतला...', गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 13:22 IST

गोवाचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी समन्स बजावला आहे. गोव्यात असलेला गौरव आर्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाला आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने हॉटेलियर गौरव आर्याला समन्स बजावला आहे. गोव्यात असलेला गौरव आर्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झाला आहे. 

गौरव आर्याला आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. गौरव आर्या मुंबईत दाखल झाला आहे. टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव आर्या गोव्यातील अंजुना भागात असलेल्या आपल्या हॉटेलमध्ये होता.  सीबीआयच्या रडारवर असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांचे जुने संबंध असलेल्याचे ईडीच्या तपासात चॅट्समधून उघड झाले. त्यानंतर ईडीने गौरवलाही चौकशीसाठी बोलवून घेतले आहे.

गोवा एअरपोर्टवर गौरव आर्याने सांगितले की, या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. मी सुशांत सिंग राजपूतला कधीच भेटलो नाही. मी रियाला 2017 साली भेटलो होतो.

गौरव आर्या हा गोव्यातील वागाटेरमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. गौरवसोबत बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान आणि 19 जणांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती