Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इश्‍कजादे'मधून पदार्पण केल्‍यापासून मला इतकं प्रेम आणि सन्‍मान कधीच मिळाला नव्‍हता, अर्जुन कपूरने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:11 IST

म्‍ही कलाकार प्रेम व अवधानासाठी आसुसलेले असतो आणि आम्‍ही स्‍वत:ला प्रत्‍येकवेळी उत्तमरित्‍या सादर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. प्रेक्षक व समीक्षकांकडून मिळणा-या प्रशंसेमुळेच आम्‍हाला पुढे जाण्‍यास प्रोत्‍साहन मिळते.

बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूर म्‍हणतो की 'संदीप और पिंकी फरार (एसएपीएफ)'मधील त्‍याच्‍या प्रशंसित करण्‍यात आलेल्‍या अभिनयाने त्‍याचा पदार्पणीय चित्रपट 'इश्‍कजादे'साठी मिळालेले प्रेम व सन्‍मान पुन्‍हा मिळवून दिला आहे. एसएपीएफमध्‍ये अर्जुनने भ्रष्‍ट पोलिस इन्‍स्‍पेक्‍टर पिंकी दाहीयाची भूमिका साकारली आहे आणि त्‍याने त्‍याच्‍या अभिनय कौशल्‍यांसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अर्जुन म्‍हणाला, ''चित्रपट 'इश्‍कजादे'मधून पदार्पण केल्‍यापासून मला इतके प्रेम व सन्‍मान कधीच मिळाला नव्‍हता. आम्‍ही कलाकार प्रेम व अवधानासाठी आसुसलेले असतो आणि आम्‍ही स्‍वत:ला प्रत्‍येकवेळी उत्तमरित्‍या सादर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. प्रेक्षक व समीक्षकांकडून मिळणा-या प्रशंसेमुळेच आम्‍हाला पुढे जाण्‍यास प्रोत्‍साहन मिळते. मला एसएपीएफला मिळालेल्‍या यशाचा आणि प्रेक्षकांनी माझ्या अभिनयाच्या केलेल्‍या कौतुकाचा खूप आनंद झाला आहे. ही अत्‍यंत दुर्मिळ व खास भावना आहे आणि माझ्या मनामध्‍ये ही भावना कायमस्‍वरूपी राहिल.'' 

अभिनेता म्‍हणाला की, ही प्रशंसा त्‍याला अधिक उत्तमप्रकारे अभिनय सादर करण्यास प्रोत्‍साहन देईल. अर्जुन म्‍हणाला, ''यामुळे मला एक परफॉर्मर म्‍हणून अधिक उत्तम कामगिरी करण्‍यास प्रोत्‍साहन मिळेल. मी करत असलेल्‍या चित्रपटांमुळे समीक्षकांचा मी आवडता अभिनेता नाही. म्‍हणूनच त्‍यांनी माझ्या अभिनयाचे केलेले कौतुक पाहून मी भारावून गेलो आहे आणि मी त्‍यांचे जितके आभार मानेन ते कमीच आहे.''

अर्जुन एसएपीएफच्‍या यशाकडे त्‍याच्‍या अभिनय करिअरमधील नवीन टप्‍प्‍याची सुरूवात म्‍हणून पाहतो. तो म्‍हणाला, ''एक कलाकार म्‍हणून प्रशंसा मिळणे सोपे नाही आणि मी या टप्‍प्‍यामधून गेलो आहे. म्‍हणून माझी या क्षणाचा अधिकाधिक आनंद घेण्‍याची इच्‍छा आहे आणि या यशाला अधिक पुढे घेऊन जात माझ्या आगामी प्रोजेक्ट्समध्‍ये अधिक उत्तम अभिनय सादर करण्‍यास मी उत्‍सुक आहे.''  

 

टॅग्स :अर्जुन कपूर