Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा सोडणार नाही आई-वडीलांचे घर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 10:08 IST

 श्रद्धा कपूर सध्या तिच्या करीअरच्या सर्वांत यशस्वी काळाचा अनुभव घेत आहे. नुकताच तिचा बागी चित्रपट रिलीज झाला. तसेच ती ...

 श्रद्धा कपूर सध्या तिच्या करीअरच्या सर्वांत यशस्वी काळाचा अनुभव घेत आहे. नुकताच तिचा बागी चित्रपट रिलीज झाला. तसेच ती आता ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. बागीच्या यशामुळे तिने स्वत:लाच जुहू येथे घर गिफ्ट केले.बरं, आता हे नवे घर तिचे आई वडील शिवांगी-शक्ती यांच्या घरापासून काही थोड्या अंतरावर आहे. मध्यंतरी असे कळाले होते की, ती आता तिच्या आईवडीलांच्या घरातून बाहेर पडून तिच्या स्वत:च्या घरात राहायला जाणार आहे.पण, तिने नुकतेच एक बाब सर्वांना सांगितली की, ‘ हो, मी घर खरेदी केलेय. पण, मी माझ्या आईवडीलांचे घर मात्र सोडणार नाही. मला माझ्या कुटुंबियांसमवेत राहायला खरंतर आवडते. दुसरे घर माझ्या मिटींग्ज आणि माझ्या कामासाठी असणार आहे. ’श्रद्धा सध्या शाद अली यांच्या ‘ओके जानू’ चित्रपटासाठी आदित्य रॉय कपूर सोबत शूटिंग करत आहे.