Join us

"मला विश्वास नव्हता...", पहिलं लग्न वाचवण्यासाठी आमिर खानने दीड वर्ष केलेले प्रयत्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:34 IST

Aamir Khan : आमिर खानने त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून घटस्फोट घेत असताना त्याने त्याचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सतत चर्चेत येत असतो. दोन घटस्फोटानंतर तो तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. आमिर खानचे त्याची एक्स पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि रीना दत्ता (Reena Dutta) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. अभिनेत्याची मुलगी आयरा खानच्या लग्नात आमिरच्या संपूर्ण कुटुंबाचं छान बॉण्डिंग पाहायला मिळालं. आमिर खान म्हणाला की, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून घटस्फोट घेत असताना त्याने त्याचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या जोडप्याने विवाह सल्लागाराचीही मदत घेतली, पण अखेर ते परस्पर संमतीने वेगळे झाले.

पिंकव्हिलाशी बोलताना आमिर खान म्हणाला की, सुरुवातीला तो लग्नाच्या समुपदेशनाच्या विरोधात होता, परंतु २-३ सत्रांनंतर तो त्याच्या समुपदेशकावर विश्वास ठेवू लागला. अभिनेता म्हणतो की तो सुमारे दीड वर्षे विवाह सल्लागाराकडे गेला. आमिर खानला विचारण्यात आले की त्याने पहिल्यांदा थेरपी कधी घेतली? तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा... ती थेरपी नव्हती; मला वाटतं ते समुपदेशनासारखं होतं.' तो पुढे म्हणाला, 'जेव्हा रीना आणि मी वेगळे होत होतो, तेव्हा आम्ही सुमारे दीड वर्षे विवाह सल्लागाराकडे गेलो होतो. थेरपी आणि समुपदेशनाचा तो माझा पहिला अनुभव होता आणि मला आठवतंय की मी त्याच्या पूर्णपणे विरोधात होतो. मी त्याला खूप विरोध केला. त्याने रीनाला सांगितले की त्याला त्याच्या भावना किंवा अनोळखी व्यक्तीकडे त्यांच्या नात्याबद्दल बोलायचे नाही. "मी माझे मन एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर कसे शेअर करू शकतो?"

मॅरिज काउंसलरकडे जाण्यासाठी अभिनेता करत होता संकोचआमिर खान म्हणाला की, त्याची एक्स पत्नी रीना दत्ता हिने त्याला मॅरिज काउंसलरकडे जाण्यास भाग पाडले होते. आमिर म्हणतो की सुरुवातीला तो संकोच करत असला तरी त्याचा अनुभव त्याच्या भीतीच्या पूर्णपणे विरुद्ध होता. तो म्हणतो की पहिल्या सत्रांमध्ये तो खूप शांत राहिला आणि जास्त बोलत नव्हता, परंतु २-३ सत्रांनंतर तो त्याच्या थेरपिस्टवर विश्वास ठेवू लागला. तो म्हणतो की त्याच्या भीतीच्या उलट, परिस्थिती खूपच चांगली होती. आमिर पुढे म्हणाला की जेव्हा तुमच्याकडे एक चांगला थेरपिस्ट असतो तेव्हा हळूहळू विश्वासाची भावना निर्माण होते. जसजसा हा विश्वास वाढत जातो तसतसे त्यांना ज्या गोष्टी व्यक्त करण्यास पूर्वी संकोच वाटत होता त्याबद्दल उघडपणे बोलणे सोपे होते.

आमिर खान दोन्ही पत्नीपासून झाला विभक्तआमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत आयरा खान आणि मुलगा जुनैद खान. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर अभिनेत्याने दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले. आमिर खान आणि किरण राव देखील वेगळे झाले आहेत. त्यांना एक मुलगा आहे. आता आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. अलिकडेच त्याने मीडियासमोर गौरीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले.  

टॅग्स :आमिर खान