Join us

‘मी कॅटच्या घरी गेलो नव्हतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 10:12 IST

काही दिवसांपूर्वी सुत्रांकडून कळाले होते की, ‘रणबीर कपूर हा कॅटरिना कैफच्या नवीन घरी गेला होता. ती त्याची ‘सिक्रेट व्हिजीट’ ...

काही दिवसांपूर्वी सुत्रांकडून कळाले होते की, ‘रणबीर कपूर हा कॅटरिना कैफच्या नवीन घरी गेला होता. ती त्याची ‘सिक्रेट व्हिजीट’ एका मित्राच्या येण्याने सिक्रेट राहिलीच नाही. त्याच्याकडूनच सर्वांना कळाले की, रणबीर-कॅटमध्ये आता सर्व ‘आॅल इज वेल’ झाले आहे.मात्र, रणबीर तर म्हणतोय की, त्या सगळ्या बातम्या खोट्या होत्या. मी तिच्या घरी गेलोच नव्हतो. तो पुढे बोलतांना म्हणतो,‘ या सर्व खरंच अफवा आहेत. मला या गोष्टीचे वाईट वाटतेय की, मीडियातील काही लोक मला तिच्यासोबत भेटण्यासाठी बातम्यांमधून प्रोत्साहन देतात.आणि काही भाग अशा खोट्या बातम्या का पसरवतात?’ लवकरच रणबीर कपूर ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटामध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन, फवाद खान आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत दिसणार आहे. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.