Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चित्रपटात जसा दिसतो तसा मी नाहीच; नात्यांबद्दल माझे विचार पांरपरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 19:57 IST

रणवीर सिंग आॅन स्क्रिन अनेक अभिनेत्रींशी रोमांस करताना दिसतो. दीपिका पादुकोणसोबत त्याचे नावही जोडले जाते. मात्र रणवीर सिंगच्या मते ...

रणवीर सिंग आॅन स्क्रिन अनेक अभिनेत्रींशी रोमांस करताना दिसतो. दीपिका पादुकोणसोबत त्याचे नावही जोडले जाते. मात्र रणवीर सिंगच्या मते तो आपल्या रिलेशनशीपबद्दल पारंपारिक विचारांचा आहे. रणवीर सिंगचे स्टार सध्या चांगलेच चमकत आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांसोबत तो काम करतोय. आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्याला स्क्रिन शेअर करताना मिळत आहे. दीपिका पादुकोणपासून ते आताच्या वाणी कपूरसोबत त्याचे नावही जोडले जात आहे. मात्र, जेव्हा माझ्या रिलेशनशीपबाबत तुम्ही मला विचाराल तेव्हा मी पारंपारिक विचार श्रेणीतील व्यक्ती असतो. ‘बेफि क्रे’च्या एका गाण्याच्या लाँचिग कार्यक्रमात रणवीर म्हणाला, रोमाँटिक संबधाचे अनेक पैलू असतात. याचा विचार एकाच प्रकारे केला जाऊ शकत नाही. आज ज्या प्रमाणे स्त्री-पुरुषांचे संबध दिसून येत आहेत, त्यात एका पिढीचे अंतर आहे. मी अशा पिढीत जन्मलो जेथे सोशल मीडियाचा प्रभाव फार कमी होता. यामुळे माझ्या विचार त्या पिढीचे आहे ज्याला आपण पारंपारिक म्हणू शकतो. सिनेमा आजच्या युवकांत असलेल्या संबंधावर काम करित असतो. रणवीर म्हणाला, मला अशा दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडेल जे माझ्या अभिनय क्षमतेला वाव देतील. आदित्य चोपडासोबत काम करताना बरेच काही शिकायला मिळाले असे त्याला सुचवायचे होते. यावेळी वाणी कपूरनेही रणवीरचीच री ओढली. वाणी म्हणाली, जेव्हा तुम्ही मला संबंधाबद्दल विचाराल तेव्हा मी देखील पारंपरिक विचारच करेल. मला कुणाकडून काही हवे आहे असा विचारच मी करीत नाही. माझी मागणीही काहीच नसते.