Join us

'ए दिल ए मुश्किल' मध्ये मी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:33 IST

            करण जोहर दिग्दर्शित करीत असलेल्या ए दिल ए मुश्किलमध्ये मी काम करणार नाही. मी त्या चित्रपटाचा भाग नाही, ...

            करण जोहर दिग्दर्शित करीत असलेल्या ए दिल ए मुश्किलमध्ये मी काम करणार नाही. मी त्या चित्रपटाचा भाग नाही, असे स्पष्टीकरण अभिनेत्री सनी लिओनी हिने दिले आहे. रणबीर कपूर, ऐर्श्‍वया राय-बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत सनी देखील दिसणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे सनीने हा खुलासा केला आहे. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, मी या चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त खरे नाही. लोक अशी अफवा पसरवत असतात. माझ्यावर विश्‍वास ठेवा. मी माझा कोणताही नवा प्रोजेक्ट करताना त्याबाबत आधी माझ्या चाहत्यांना माहिती देते.          त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे, त्याला तसा कोणताही आधार नाही. या खुलाशामुळे एक पहेली लिलाची स्टार देखील या अफवांमधून सुटू शकलेली नाही, हेच दिसते. अशीही एक अफवा आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सोहेल खान यांच्यासोबतही काम करण्यास सनी उत्सुक आहे. त्यासाठी तिने पुढाकार घेऊन तसा प्रयत्न केला होता. मात्र, ही देखील केवळ अफवाच असल्याचे तिने म्हटले आहे. स्वत:चं प्रोडक्शन हाऊस असावे, यासाठी सनी लिओनी सध्या प्रयत्न करीत असल्याचे समजते. मला प्रोडक्शन हाऊस बनवायचे आहे. ही एक अत्यंत सुंदर कल्पना आहे. मात्र, भविष्यात काय होईल, माहित नाही, असे ती सांगते.