कोरोनाच्या संकटामुळे सिनेइंडस्ट्रीतील कित्येक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम कमी असल्यामुळे कित्येक कलाकारांना रोजगार नाही आणि त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसेदेखील नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे सिनेइंडस्ट्री पुन्हा उभारी घेताना दिसत आहे. काही कलाकारांनी कामाला सुरूवातदेखील केली आहे. मात्र असे काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे सध्या काम नाही आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात अभिनेता रेशम अरोरा ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अग्निपथ चित्रपटाव्यतिरिक्त बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.
रेशम अरोरा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, माझ्याकडे आतापर्यंत काहीच काम नाही. अशी नामुष्की तेव्हापासून आली आहे जेव्हा लॉकडाउनला सुरूवात झाली होती. लोक म्हणत आहेत की आता सगळे सुरळीत होत आहे पण आतापर्यंत मला काम मिळण्याबाबत कोणतेच आशेचे किरण दिसत नाही.