Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मीच सर्वोत्तम लखन : अनिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:02 IST

रोहित शेट्टी ‘राम-लखन’चा रिमेक बनवणार असल्याची चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. तेव्हापासून अनेक स्टार्सची नावे समोर आली. आता ...

रोहित शेट्टी ‘राम-लखन’चा रिमेक बनवणार असल्याची चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. तेव्हापासून अनेक स्टार्सची नावे समोर आली. आता कुठे शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आहे. याबाबत जेव्हा ‘ओरिजनल लखन’ अनिल कपूरला विचारले असता तो म्हणाला, लखनची भूमिका माझ्यापेक्षा चांगली कोणीच करू शकत नाही. यावर मी शर्यतदेखील लावू शकतो. रिमेक बनवू द्या, मग आपण बोलू.’ 1989 साली प्रदर्शित ‘राम-लखन’चे सुभाष घई यांनी दिग्दर्शन केले होते. पुढे तो म्हणाला, लखनचा रोल साकारणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. एकदम जीव ओतून मी ती भूमिका केली होती. खरं तर मला या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला हवा होता. त्याकाळचा तो ब्लॉकबस्टर हीट चित्रपट होता. रिमेकमध्ये ‘लखन’च्या पात्रासाठी रणवीरची निवड योग्य आहे.