Join us

"मी नेहमी खिशात कंडोम ठेवतो", वयाच्या १२व्या वर्षी अभिनेत्याने गमावली व्हर्जिनिटी, अनेकवेळा केलं वन नाइट स्टॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:19 IST

या बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्याने असे अनेक खुलासे केले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्याने सांगितले की तो नेहमीच खिशात कंडोम ठेवतो.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्टोवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. ते कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्सेही शेअर करतात. या बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्याने असे अनेक खुलासे केले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्याने सांगितले की तो नेहमीच खिशात कंडोम ठेवतो. 

हा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh). त्याने २०१४ मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की त्याने १२ व्या वर्षी आपली व्हर्जिनिटी गमावली आहे. २०१४ मध्येच एका मुलाखतीत रणवीर सिंग म्हणाला होता की, मुली माझ्याकडे येतात. २०१६ मध्येही या अभिनेत्याने हेच विधान पुन्हा सांगितले. रणवीरने मुलाखतीत असेही सांगितले होते की, तो नेहमीच खिशात कंडोम ठेवतो. अभिनेत्याने सांगितले की मुलंही त्याचा पाठलाग करायचे आणि खूप अश्लिल मेसेज पाठवायचे.

रणवीर सिंगने केलाय कास्टिंग काउचचा सामना

कास्टिंग काउचबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, त्याला एका दिग्दर्शकाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने नकार दिला. २०१३ मध्ये रणवीरने करण जोहरच्या चॅट शोमध्ये वन नाईट स्टँड असल्याची कबुली दिली. अभिनेत्याने सांगितले की, त्याचे एकापेक्षा जास्त वेळा वन नाईट स्टँड केले आहेत. रणवीरच्या मते, शारीरिक संबंध ठेवणे ही एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती अजिबात वाईट किंवा चांगली गोष्ट नाही. मात्र, आता रणवीर सिंग विवाहित आहे आणि त्याचे त्याची पत्नी दीपिका पादुकोणवर खूप प्रेम आहे. त्यांची छान केमिस्ट्री नेहमीच पाहायला मिळते.

टॅग्स :रणवीर सिंग