Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पती राज कुंद्राने केली मोठी चुक, शिल्पाने शिकवला चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 16:09 IST

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. या दरम्यान दोघंही मनोरंजनासाठी विविध युक्त्या लढवतांना दिसत आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत.

शिल्पा शेट्टी अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असते.  तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा मजेशीर व्हिडीओ असून यात शिल्पा काम करण्यात मग्न दिसत आहेत. तितक्यात पती राजकुंद्रा तिला मध्येच किस करतो. तेव्हा वैतागुन शिल्पा बोलते काम करत असताना उगाच किस करून व्यत्यय आणत जाऊ नकोस...तितक्यात घरात काम करणारी बाई येते आणि बोलते की, मॅडम तुम्ही समजावून ठेवा मी तर सांगून सांगून पार वैतागली आहे.....अशा आशयाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडीओला चाहत्यांचे लाखो हिट्स मिळाले होते. इतर सेलिब्रेटींप्रमाणे शिल्पाचेही कमी वेळेत टीक-टॅाकचे खूप चांगले फोलोवर्स झाले होते. त्याच काळातला हा व्हिडीओ आहे.

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरातच आहे. या दरम्यान दोघंही मनोरंजनासाठी विविध युक्त्या लढवतांना दिसत आहेत. दोघांनी मिळून आतापर्यंत अनेक टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ नेटकरीही खूप पसंत करत आहेत. सोशल मीडियावर शिल्पाचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते.

राज कुंद्राने  त्याच्या टिष्ट्वटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शिल्पा आणि राज हे दोघे दोन खुर्च्यांवर सोबत बसलेले आहेत. ते अत्यंत वयस्कर दिसत आहेत. त्या दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ बेबी, ये लॉकडाऊन केव्हा संपेल? शिल्पा शेट्टीसोबत लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहे.’ या फोटोला बघून असे वाटते की, लॉकडाऊन संपेपर्यंत हे दोघे चक्क म्हातारे झाले आहेत. हा अत्यंत फनी फोटो पाहून तुम्ही अक्षरश: लोटपोट व्हाल, यात काही शंका नाही.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा