Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक-कंगणा यांनी एकमेकांना पाठवल्या नोटिसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 05:15 IST

हृतिक रोशन आणि कंगणा राणावत यांच्या नातेसंबंधांनी खुपच वेगळे वळण घेतले आहे. त्या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या असून ...

हृतिक रोशन आणि कंगणा राणावत यांच्या नातेसंबंधांनी खुपच वेगळे वळण घेतले आहे. त्या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या असून शाब्दिक चकमकी आणि एकमेकांवर आरोप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आता तुम्हाला वाटेल की, नेमकं झालं तरी काय ? तर काही दिवसांपूर्वी अफवा होती की, हृतिक आणि कंगणा हे एकमेकांना डेटींग करत आहेत. हृतिक चे वडील रोशन हे काही या सर्व प्रकरणामुळे काही फार खुश नव्हते. नंतर त्यांचा ब्रेक -अप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्या दोघांनीही माध्यमांचा वापर करून एकमेकांवर शिंतोडे उडवले.कंगणाने केलेल्या वाईट कमेंटनंतर हृतिक म्हणाला,‘ मी एखाद्या बाईला डेट करण्यापेक्षा पोपलाच डेट करण्याची शक्यता जास्त आहे. ’ शेवटी, हृतिकने कंगणाला त्याचा वकील दिपीश मेहताकडून कायदेशीर नोटिस पाठवली. त्यानंतर कंगणाने २१ पानी नोटिस त्याला पाठवली. आता कंगणाने हृतिकला पाच दिवसांचा कालावधी दिला असून त्याचा रिप्लाय काय येतो हे पाहणे गरजेचे आहे.