Join us
Daily Top 2Weekly Top 5

टर्कीमध्ये हृतिकची फ्रेंड्ससोबत पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 11:27 IST

हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्या वादामुळे बॉलीवूडला एक वेगळेच वळण मिळाले आहे. तरी, बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन हा स्वत:ला एकदम ...

हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्या वादामुळे बॉलीवूडला एक वेगळेच वळण मिळाले आहे. तरी, बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन हा स्वत:ला एकदम कुल, रिलॅक्स ठेवू पाहत आहे.तो नुकताच टर्कीतील अंतल्या या ठिकाणी एका मित्राच्या लग्नासाठी गेला आहे. तिथे तो नेहा धुपिया, जरीन खान आणि त्याची पत्नी सुझानचा भाऊ जायेद खान यांच्यासोबत दिसत आहे. सुझान ही त्याच ट्रीपवर गेली होती. पण, ती हृतिक तिथे येण्याअगोदरच फॅमिलीसोबत बाहेर पडली.जरी सुझान तिथून काही कारणामुळे निघाली असली तरी जायेद खान मात्र हृतिकसोबत तिथे पार्टीसाठी थांबला होता. हृतिकने फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ अंतल्या नाईट्स! लाईफ इज अ‍ॅन अ‍ॅडव्हेंचर! मेकिंग इच एक्स्पिरियन्स काऊंट!  लाईव्ह.’