हृतिक काम करणार ‘राकेश’सोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 21:12 IST
हृतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीपासूनच दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्याच्या अभिनयाची प्रसंशा देखील केली जाते. तरीही त्याच्यावर ‘पापा’ राकेश ...
हृतिक काम करणार ‘राकेश’सोबत?
हृतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीपासूनच दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्याच्या अभिनयाची प्रसंशा देखील केली जाते. तरीही त्याच्यावर ‘पापा’ राकेश रोशन यांच्या चित्रपटातूनच यश मिळत असल्याचा ठपका ठेवला जातो. मोहेंदजोदरोच्या अपयशाने निराश झालेल्या हृतिक रोशनला आता बॉलिवूडमधील दुसरा राकेश म्हणजे राकेश ओमप्रकाश मेहरासोबत काम करायचे आहे. बॉलिवूडमध्ये सध्या हृतिक रोशनची चांगलीच चर्चा आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदडो या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर अपेक्षिर यश मिळाले नाही. दरम्यान कंगना -हृतिकचा वाद आणखीच चिघळला. त्याला आता आगामी काबील चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहे. राकेश रोशन यांच्या होमप्रोडक्शनमध्ये तयार होत असलेल्या काबीलचे दिग्दर्शन संजय गुप्ता करीत आहेत. मात्र यानंतरच्या प्रोजेक्टसाठी राकेश ओमप्रकाश मेहरा व हृतिक यांची बोलनी झाली आहे. आम्ही एका चित्रपटासंदर्भात बोललो असा दुजोरा हृतिककडून देण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘मिर्झिया’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘रंग दे बसंती, दिल्ली 6 व भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.