Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक ठरला ‘सर्वात हँडसम’ चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 12:04 IST

तुम्ही म्हणाल हे तर सर्वांनाच माहित आहे. अहो, पण आपल्या या ‘ग्रीक गॉड’ हृतिकच्या सौंदर्यावर आता जगभरातील चाहत्यांची मोहर ...

तुम्ही म्हणाल हे तर सर्वांनाच माहित आहे. अहो, पण आपल्या या ‘ग्रीक गॉड’ हृतिकच्या सौंदर्यावर आता जगभरातील चाहत्यांची मोहर उमटली आहे. एका लोकप्रिय वेबसाईटने केलेल्या आॅनलाईन सर्व्हेनुसार हृतिक रोशन तिसऱ्या क्रमांकाचा ‘सर्वांत सुंदर चेहऱ्या’चा व्यक्ती ठरला आहे.जगातील ‘टॉप १० मोस्ट हँडसम फेसेस’च्या यादीमध्ये ह्यु जॅकमन, जॉनी डेप, ब्रॅड पिट यांना मागे टाकत  हृतिकने तिसरे स्थान पटकावले आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ स्टार टॉम क्रुझला सर्वाधिक पसंती मिळाली असून त्यानंतर ‘ट्वाईलाईट’ फेम रॉबर्ट पॅटिन्सन दुसऱ्या क्रमांकावर आहे.२०१६-१७ या एका वर्षादरम्यान जगातील सर्वात सुंदर चेहरा कोणता असा प्रश्न या आॅनलाईन सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. हृतिकबरोबरच  यामध्ये दुसरा बॉलीवूड कलाकारसुद्धा आहे. तो इतर कोणी नसून खुद्द दबंग सलमान खान आहे. सातव्या क्रमांकावर तो आहे. म्हणजे यंदा बॉलीवूडचे दोन कलाकार जगातील सर्वाधिक सुंदर पुरुषांच्या यादीमध्ये सामाविष्ट झाले आहेत.ग्रीक गॉड : हृतिक रोशनयादीमध्ये ओमार बोरकान अल गॅला, ब्रॅड पिट, ह्यु जॅकमन, बिली उंगर यांचासुद्धा सामावेश आहे. अप्रतिम डान्सिंग स्कील आणि बघत राहावे असे रुप यांच्या जोरावर हृतिक गेली दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिकराज्य गाजवत आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातील म्हणजे २००० साली जानेवारी महिन्यात त्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण केले.‘एक पल का जीना’मधील त्यांची सिग्नेचर डान्स स्टाईल असो वा ‘कोई मिल गया’मधील साधा-भोळा एलियनशी मैत्री करणारा ‘रोहित’ किंवा ‘धुम २’मधील सफाईदार चोर, हृतिकची जादू नेहमीच चाहत्यांना भुरळ घालते. पीळदार शरीर, जणू काही इटालियन मूर्तीकाराने घडवलेले रुप आणि मर्मभेदक हिरवे डोळे असणाऱ्या हृतिकचे कौतुक करावे तेवढे कमीच!