Join us

​हृतिकने आजोबांना भेट दिली मर्सिडिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 20:44 IST

हृतिक रोशन हा त्याचे आजोबा(नाना) जे ओम प्रकाश यांच्या सर्वाधिक जवळ आहे. नाना हा हृतिकचा वीक पॉईन्ट. अनेक प्रसंगी ...

हृतिक रोशन हा त्याचे आजोबा(नाना) जे ओम प्रकाश यांच्या सर्वाधिक जवळ आहे. नाना हा हृतिकचा वीक पॉईन्ट. अनेक प्रसंगी नानांबद्दलचे प्रेम हृतिकने बोलूनही दाखवले आहे. याच प्रेमापोटी हृतिकने नानांना एक गोड भेट द्यायचे ठरवले. नाना मर्सिडिजचे चाहते आहेत, हे हृतिकला ठाऊक होते. मग काय, हृतिकने नानांना सरप्राईज द्यायचे ठरवले. मग काय, एक न्यू ब्रॅण्ड मर्सिडिज नानांच्या घरापुढे येऊन उभी राहिली. नातवाची ही भेट पाहून नानांना गहिवरून आले नसेल तर नवल? त्यांनी हृतिकला लगेच मिठी मारली. मग काय नातवासोबत आजोबांनी मर्सिडिजची मस्त सैरही केली.