Join us

दुबईत मुलांसोबत हृतिक-सुझैन व्हॅकेशन्सवर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 13:20 IST

हृतिक रोशन आणि सुझैन खान हे सध्या मुले रेहान आणि ह्रीदान  यांच्यासोबत दुबईत व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहेत. हृतिक-सुझैनचा घटस्फोट ...

हृतिक रोशन आणि सुझैन खान हे सध्या मुले रेहान आणि ह्रीदान  यांच्यासोबत दुबईत व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहेत. हृतिक-सुझैनचा घटस्फोट झाला असला तरीही ते केवळ त्यांच्या मुलांसाठी दुबईत एकत्र आले असे जाणवतेय. ते दोघे आजही चांगले मित्र असून बीचेसवर मुलांसोबत ते ‘फुल्ल टू धम्माल’ करतानांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. न्यू ईअरचे सेलिब्रेशन ते दुबईत करणार असल्याचेही सुत्रांकडून कळतेय.                        पत्नी सुझैनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दोन्ही मुलांना व्हॅकेशन्सवर नेण्याची जबाबदारी एकट्या हृतिकवरच आली. त्यामुळे तो अधूनमधून मुलांना घेऊन आऊटिंग आणि व्हॅकेशन्सवर जात असतो. मध्यंतरी, तो  फ्रेंच अल्पस येथे त्याच्या मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी गेला होता. हृतिक-सुझैन यांचा हा एका महिन्यातील दुसरा पब्लिक अ‍ॅपिअरन्स होता. याअगोदर ते दुबईच्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र मुलांसोबत दिसले होते. ते एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. तसेच रेस्टॉरंटमधून जाताना ते एकाच कारमध्ये गेले यावरून त्यांच्यातील जवळीकता वाढल्यासारखे जावणतेय. तरी सुझैनने टिवटरवरून शेअर केले होते की, ‘ मी चाहत्यांना विनंती करते की, तुम्ही माझ्या आणि हृतिकच्या नात्याबद्दल अफवा पसरवू नका. कारण, आमच्यासाठी मुलं हीच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यांना शिकवून मोठं करणं हेच आमचं आयुष्यातील ध्येय आहे. त्यांच्यासमोर आमच्या नात्याला काही देखील किंमत नाही. त्यांच्यासाठी आम्हाला आमचं नातं टिकवायचं आहे.’                         आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटल्यानंतर त्याला त्याचा आगामी चित्रपट ‘काबील’ कडून प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून यामीसोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते हे आता वेळच सांगेल.