Join us

या पुढे लीक नाही होणार ह्रतिक रोशनचा 'सुपर ३०'मधला लूक, चित्रपटाच्या टीमने उचलले हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 12:43 IST

ह्रतिक रोशनच्या आगामी चित्रपट 'सुपर ३०'च्या सेटवरचे फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर लीक होताना दिसतायेत. फोटो लीक झाल्यानंतर प्रोडक्शन ...

ह्रतिक रोशनच्या आगामी चित्रपट 'सुपर ३०'च्या सेटवरचे फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर लीक होताना दिसतायेत. फोटो लीक झाल्यानंतर प्रोडक्शन टीमने सेटवरची सुरक्षा वाढवली आहे.  'सुपर ३०'च्या प्रो़क्शन टीमला नाही वाटतत की चित्रपटाशी संबंधीत कोणतीही माहिती लीक व्हावी. चित्रपटातील कथेनुसार टीमने मुंबईत सेट न उभारता रिअल लोकेशनवर जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र यात ह्रतिक रोशनसारखा प्रसिद्ध कलाकार काम करत असल्याने ते शक्य झाले नाही. कारण ज्यावेळी चित्रपटाची शूटिंग सुरु व्हायची ह्रतिकचे फॅन्स त्याठिकाणी गर्दी करायचे.  काही दिवसांपूर्वी ह्रतिकचे पापड विकतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात तो रस्त्यावर पापड विकताना दिसत होता. दाढी आणि केस वाढलेल्या अंदाजात हृतिक दिसत होता. मात्र शूटिंगच्यावेळी वाढती गर्दी लक्षात घेता निर्मात्यांनी अज्ञात स्थळी जाऊन शूट करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती पण नंतरच्या २ वर्षातच त्याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली  नंतर या गोष्टी रून प्रेरित होऊन त्यांनी 'सुपर३०' ची सुरवात केली. आनंद कुमार बिहारात सुपर ३०'  नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. पुढच्या वर्षी 25 जानेवरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO RAED :  हृतिक रोशन त्याच्या मित्राच्या मुलीसोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स