Join us

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड लग्नाआधीच प्रेग्नेंट?, पोस्ट पाहून कन्फ्युज झाले चाहते, म्हणाले - आधी लग्न करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:02 IST

Hritik Roshan And Saba Aazad : अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बी-टाऊनमधील चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केले जातात आणि सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून कपल गोल देखील देतात.

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) हे बी-टाऊनमधील चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केले जातात आणि सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करून कपल गोल देखील देतात. पण सध्या हृतिक आणि सबा त्यांच्या केमिस्ट्रीमुळे नाही तर इतर काही कारणांमुळे चर्चेत आहेत. वास्तविक सबाने अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे चाहते हैरणा झाले आहेत.

सबा आझादने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. सबाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तुमचा स्त्रीरोगतज्ञ कोण आहे असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करताना सबाने लिहिले की, 'सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.' सबाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत आणि त्यांनी अभिनेत्रीला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

युजर्संनी सबावर केला प्रश्नांचा भडिमारासबाच्या या पोस्टवर कमेंट करत यूजर्स तिला विचारत आहेत की ती प्रेग्नंट आहे का? याशिवाय काही लोकांनी सुझान खान आणि हृतिक रोशनला टॅग करून हाच प्रश्न विचारला आहे की, 'ज्युनियर हृतिक येत आहे का..' मात्र, या पोस्टवर आत्तापर्यंत सबा किंवा हृतिकने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

सबाने हृतिकच्या कुटुंबासोबत केली पूजानुकतीच सबा आझादही हृतिक रोशनच्या घरी पोहोचली होती. जिथे ती गणपती विसर्जनात सहभागी झाली होती. अभिनेत्याने त्याचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी सबाने हृतिकच्या भाचीच्या वाढदिवसालाही हजेरी लावली होती. सबाचे अभिनेत्याच्या कुटुंबाशीही चांगले संबंध आहेत.

टॅग्स :हृतिक रोशन