'काबिल'सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खानने मुलांसह लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 16:31 IST
हृतिक रोशन आणि सुझैन यांच्या रोमँटीक प्रेमकहानी पेक्षा ही जोडी या दोघांच्या घटस्फोट या कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली.मात्र गेल्या ...
'काबिल'सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खानने मुलांसह लावली हजेरी
हृतिक रोशन आणि सुझैन यांच्या रोमँटीक प्रेमकहानी पेक्षा ही जोडी या दोघांच्या घटस्फोट या कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली.मात्र गेल्या काही दिवसांपासून दुरावा असणा-या या कपलमध्ये आता रूसवे फुगवे दुर होत पुन्हा एकदा नात्यांचा गोडवा जाणवत आहे. काहि दिवसांपूर्वीच रेहान आणि ह्रीदानसह मुलांसह हृतिक आणि सुझैन लंडनच्या रस्त्यांवर फिरतांना दिसले.इतकेच नाही तर डिसेंबर महिन्यात दुबईत मुलांसह व्हेकेशन एंन्जॉय करताना दिसले.या दोघांच्या वाढणा-या जवळीकमुळे दोघांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असून पुन्हा ते एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. याच गोष्टींमुळे हृतिक आणि सुझैन यांचे पॅचअप होणार असे नाहीय, हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा 'काबिल' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुझैनने मुलांसह हजेरी लावली होती.सिनेमा पाहिल्यानंतर लगेचच सुझैनने ट्वीट करत 'काबिल' सिनेमाच्या यशासाठी दिग्दर्शक संजय गुप्ताला शुभेच्छा दिल्या. इतकेच बोलुन सुझैन थांबली नाही तर पुढे हृतिक रोशनच्या अभिनय हा मना स्पर्शून जातो भारतीय सिनेमामध्ये काबिल सिनेमा हा सगळ्यात जास्त हृदयाला भिडणारा सिनेमा असल्याचेही सुझैनने यावेळी म्हटले.हृतिकच्या अभिनयाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. हृतिकसह यामी गौतमीनेही आपल्या भूमिकेला योग्यरितीने न्याय दिला असल्याचे सुझैनने म्हटले आहे.त्यांचा एकमेकांसोबतचा सहवास वाढल्याने कदाचित त्यांना पुन्हा एकदा ‘लाईफ पार्टनर’ होण्याची इच्छा निर्माण झाली असावी असे दिसतेय. 'काबिल' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सुझैन खान व्यतिरिक्त फोटोग्राफर डब्बू रतनानी,शबाना आजमी,ऋषि कपूर, नीतू कपूर, प्रेम चोपड़ा, राकेश रोशन यांनीही या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यांमध्ये आकर्षण ठरले ते सुझैन खानने तिच्या मुलांसह लावलेली हजेरी. यांमुळे हे दोघे पुन्हा एकत्र येणार आणि संसाराल नव्याने सुरूवात करणार असेही बोलले जात आहे.