Join us

हृतिक रोशनने आपल्या 'पोस्ट पॅक अप शॉट'सोबत पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:57 IST

हृतिक रोशनने नुकताच सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अविनाश गोवारिकरसोबत आपले शूटिंग संपवल्यानंतर पोज देतानाचा हृतिक रोशनचा आकर्षक सेक्सी अंदाज समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर आग लावली आहे.

हृतिक रोशनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, या ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत लिहिले की, पॅकअप नंतर अत्यंत हुशार मि. अविनाश गोवारीकर घेतलेला शॉट.

खरे पाहायला गेले तर, अभिनेता कॅमेऱ्यासमोर असो की कॅमेऱ्याच्यामागे, डोळ्यांचे पारणे फेडतो. हृतिकतिकच्या या अनोख्या झलकेने प्रेक्षकांना मुग्ध केले आहे, हे कॉमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावावरुन दिसत आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सध्या हृतिककडे बऱ्याच सिनेमांच्या स्क्रिप्ट आहेत. यातील काही स्क्रिप्ट ऋतिकला आवडल्या आहेत तो सतत दिग्दर्शक आणि लेखकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊन संपल्यावर ऋतिक त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. जरी ही बातमी खरी ठरली तर ऋतिकच्या फॅन्स एक प्रकारचे सरप्राईज मिळेल. 

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, हृतिक रोशन शेवटचा ‘वॉर’ या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफसोबत झळकला होता. आता लवकरच तो ‘क्रिश ४’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘क्रिश’ १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर त्याने या फ्रेन्चाइजीच्या चौथ्या भागाची घोषणा केली होती. हृतिक लवकरच 'फाइटर' मध्ये दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेयर करणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशन