Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामायणवर बनणार सिनेमात ह्रतिक रोशन प्रभू रामाची नव्हे तर रावणाची भूमिका साकारणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 15:09 IST

'जोधा अकबर' मध्ये अकबरची भूमिका साकारणारा हृतिक रोशन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे.

'जोधा अकबर' मध्ये अकबरची भूमिका साकारणारा हृतिक रोशन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. मधु मंटेना यांच्या 3D रामायणातील हृतिक रोशन साकारणार असणारी व्यक्तिरेखा आता हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहे. यापूर्वी असे सांगितले जात होते की हृतिक प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारेल, तर देवी सीता यांची भूमिका  दीपिका पादुकोण साकारणार आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार  हृतिक भगवान श्री रामप्रभूंची भूमिका साकारणार नाही तर लंकापती रावणची भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार  हृतिकचे महाभारताच्या कथेवर आधारित द्रौपदी या चित्रपटाविषयी बोलणं सुरु होता पण काही कारणांमुळे हा चित्रपट सुरू होऊ शकला नाही. दरम्यान, मधु मंटेना यांच्या मेगा बजेट चित्रपटाची घोषणा केली पण एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिक यात रामची नव्हे तर रावणची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे.

याशिवाय निर्माता-दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपला ‘आदिपुरुष’ या थ्रीडी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. यात साऊथचा सुपरस्टार प्रभास श्रीराम मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खानची एंट्री रावणच्या भूमिकेसाठी आहे. क्रिती सॅनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत कोणता चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि रावणांच्या भूमिकेमध्ये प्रेक्षक सैफला की ह्रतिकला पसंती देतायेत हे पाहणं उत्सुकतेचे ठरले.  

टॅग्स :हृतिक रोशन