हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे. हृतिक व सुजैन आपल्या मुलांसोबत सर्रास एकत्र फिरताना दिसतात. अलीकडे हृतिकने सुजैनसाठी एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टवरून एकच गोष्ट सिद्ध होते, ते म्हणजे विचार, मतभेद असू शकतात. पण यानंतरही एकत्र येणे शक्य आहे. खुद्द हृतिकनेही आपल्या पोस्टमध्ये हेच लिहिले आहे.
घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर हृतिक रोशनने सुजैनसाठी लिहिली भावूक पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 09:53 IST
हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे.
घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर हृतिक रोशनने सुजैनसाठी लिहिली भावूक पोस्ट!
ठळक मुद्दे एकेकाळी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी हे एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी सुजैन खानचे डॅड संजय खान यावर बोलले होते.