Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगला रिप्लेस करत 'हा' अभिनेता साकारणार डॉन, फरहान अख्तरच्या चित्रपटात घेणार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:01 IST

'डॉन-३' ला मिळाला नवा चेहरा, रणवीरने चित्रपट सोडल्यानंतर 'या' हॅण्डसम हंकच्या नावाची चर्चा

Don 3 Movie Update: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रत्येकजण रणवीरचं 'धुरंधर'मधील त्याच्या कामामुळे भरभरुन कौतुक करत आहे. पण, सध्या हा अभिनेता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला  आहे. दरम्यान, रणवीर सिंग चर्चेत असण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे त्याने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित डॉन-३ मधून एक्झिट घेतल्याचं म्हटलं जातंय. रणवीरने हा प्रोजेक्ट सोडताच,  चित्रपटात 'डॉन' कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता याबद्दल एक मोठी अपडेट मिळते आहे. 

आता  रणवीर सिंग 'डॉन ३' मधून बाहेर पडल्यानंतर, फरहान अख्तर एका नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. याचदरम्यान, चित्रपटात बॉलिवूड मोस्ट हॅण्डसम अभिनेत्याची एन्ट्री झाल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत. अद्याप चित्रपटाच्या मेकर्सनी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  हा अभिनेता दुसरा तिसरा कोणा नसून हृतिक रोशन आहे. विशेष म्हणजे 'डॉन' चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी हृतिक रोशनचा विचार करण्यात आला होता.मात्र, फरहान अख्तरची पहिली पसंती असूनही, हा चित्रपट अखेरीस शाहरुख खानला मिळाला.आता, १९ वर्षांनंतर, हृतिकच्या नावाची पुन्हा चर्चा होत आहे. शिवाय आता निर्माते याबद्दल काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

'डॉन'चा पहिला भाग १९७८ साली प्रदर्शित झाला होता. सलीम-जावेद  लिखित हा चित्रपट  चंद्र बरोट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण आणि ओम शिवपुरी यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश होता. तो त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्यानंतर, २००६ मध्ये या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला ज्यामध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, अर्जुन रामपाल, बोमन इराणी आणि ओम पुरी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. 

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाहृतिक रोशन