Join us

हृतिक रोशनचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 10:03 IST

J. Om Prakash Death: राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक-निर्माते जे ओमप्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्दे1961 साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.

राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. 24 जानेवारी 1927 रोजी त्यांचा जन्म झाला. आखिर क्यूँ  आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

 1974 मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा.

 

अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.त्याआधी निर्माते अशी त्यांनी ओळख होती.

1961 साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला.  आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे आॅफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

टॅग्स :हृतिक रोशनराकेश रोशन