हृतिक रोशन चाहत्यांना देणार नववर्षाची आगळी-वेगळी भेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:06 IST
हृतिक रोशनने कदाचित आता आपल्या कामावर फोकस करायचे ठरवलेय. गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व कंगना राणौत या दोघांचा ...
हृतिक रोशन चाहत्यांना देणार नववर्षाची आगळी-वेगळी भेट!!
हृतिक रोशनने कदाचित आता आपल्या कामावर फोकस करायचे ठरवलेय. गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व कंगना राणौत या दोघांचा वाद गाजतोय. होय, कंगना आणि हृतिकचा वाद आता कुणासाठीही नवा राहिलेला नाही. या वादाच्या निमित्ताने दोघांच्याही आयुष्यातील जितके काही सीक्रेट चव्हाट्यावर यायचेत ते आलेत. पण वादांनी मिळून मिळून किती प्रसिद्धी मिळणार. शेवटी प्रसिद्धी अन् सोबत पैसा मिळवण्यासाठी काम तर करावेच लागेल ना. हृतिकने आता तेच ठरवलेय. असे नसते तर एकापाठोपाठ एक असे चार सिनेमे त्याने साईन केले नसते. होय, येत्या वर्षांत हृतिक चार चित्रपटांत झळकणार आहे. लवकरच तो या चारही चित्रपटाची घोषणा करणार आहे. हे चार चित्रपट म्हणजे, हृतिकचे आपल्या चाहत्यांना नववर्षाची भेट असेल. विशेष म्हणजे, हृतिकचे हे चारही चित्रपट करण जोहर प्रोड्यूस करतोय. अर्थात अद्याप या चित्रपटांचे नाव ठरलेले नाही. पण स्क्रिप्टिंगवर वेगात काम सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ च्या सुरुवातीला हृतिक एकाचवेळी या चित्रपटांची घोषणा करेल.ALSO READ : अशी साजरी झाली हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानची बर्थ डे पार्टी!हृतिक रोशनचा शेवटचा चित्रपट ‘काबील’ होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत उतरला होता. शाहरूख खानचा ‘रईस’ रिलीज झाला नसता तर हृतिकचा ‘काबील’ आणखीच ‘काबील’ ठरला असता. लवकरच हृतिक ‘सुपर30’फेम आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.अलीकडे हृतिकने हा सिनेमा साईन केला आहे. अर्थात विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटासाठी हृतिक म्हणे फर्स्ट चॉईस नव्हता, असेही कानावर आलेय. हृतिकआधी वेगळ्याच एका अभिनेत्याला घेऊन विकास बहल यांना हा सिनेमा करायचा होता. होय, विकास बहल यांना म्हणे, या चित्रपटात अक्षय हवा होता. पण अक्षयच्या डेट्स मॅच न झाल्याने या चित्रपटात हृतिकची वर्णी लागली. आता काही का असेना, हृतिकचे सिनेम येताहेत, यापेक्षा दुसरा आनंद नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितपणे पर्वणी आहे, एवढेच खरे.