Join us

'सुपर 30'च्या शूटिंगदरम्यान वाराणसीमध्ये 'या' गोष्टीच्या प्रेमात पडला ऋतिक रोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:29 IST

अभिनेता ऋतिक रोशनचा आपल्या आगामी सिनेमा ‘सुपर 30’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे'सुपर 30'च्या शूटिंग दरम्यान ऋतिक खूप वेळ वाराणसीमध्ये होता‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे

अभिनेता ऋतिक रोशनचा आपल्या आगामी सिनेमा ‘सुपर 30’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो 30 हुशार मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश परिक्षेसाठी तयार करतो. 

 'सुपर 30'च्या शूटिंग दरम्यान ऋतिक खूप वेळ वाराणसीमध्ये होता. त्यामुळे तिकडे असताना त्यांने लिट्टी चौकाचा भरपूर आनंद लुटला. ऐवढंच नाही तर ही त्याची फेव्हरेट डिश झाली आहे. 'सुपर 30'चे शूटिंग संपल्यानंतर ऋतिक या डिशला मिस करतोय.      

‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपला पूर्ण वेळ तो विद्यार्थ्यांसोबत असायचा. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. 

त्यामुळे शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर ही ऋतिक आपला सर्वाधिक वेळ मुलांसोबत असायचा. एवढंच नाही तर त्याने मुलांचे दोन गट करुन वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवायला द्यायचा. यात ऋतिकसह मृणाल ठाकूर, अमित साध आणि नंदीश संधू दिसणार आहेत. ऋतिक रोशनचा हा सिनेमा येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशन