Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हो, वाईट VCX असतात...", हृतिक रोशनची प्रतिक्रिया चर्चेत, 'रामायणम्' टीझरनंतर केलं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:19 IST

'रामायणम्' सिनेमाच्या टीझरमधील व्हीएफएक्सवरुन सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांवर हृतिक रोशनने मत मांडलं आहे.

रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली. सिनेमाच्या टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या लूकसमोर सर्वांसमोर आला. यावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कोणाला टीझर प्रचंड आवडला तर कोणी यातील व्हीएफएक्सवर टीका केली. काहींना एक सीन तर चक्क AI वाटला. इतके कोटी बजेट खर्च करुनही अशा चुका निघाल्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. आता यावर नुकतंच अभिनेता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिली आहे.

हृतिक रोशनने X वर लिहिले, "हो, वाईट व्हीएफएक्सही असतात जे बघताना त्रास होतो. विशेषत: मला आणि महत्वाचं म्हणजे ज्या सिनेमांचा मी भाग असतो  तेव्हा जास्त त्रास होतो. मला आठवतंय मी ११ वीत असताना लंडनला ट्रीपला गेलो होतो तेव्हा 'बॅक टू द फ्यूचर' पाहिला होता आणि माझा दृष्टिकोनच बदलला. मला त्या सिनेमाचं अक्षरश: वेड लागलं. वडिलांसोबत बसून व्हीएचएस प्लेयरवर तो सिनेमा लावून सतत पॉज, प्ले करत मी तो सिनेमा प्लेयर तुटेपर्यंत पाहिला.

नंतर मी माझ्या पॉकेटमनीमधून इंडस्ट्रीयल लाईट अँड मॅजिक- द आर्ट ऑफ स्पेशल इफेक्ट्स हे पुस्तक मागवलं. कित्येक महिने ते पुस्तक जुहू पोस्ट ऑफिसमध्ये यायची वाट पाहिली. ज्या दिवशी पुस्तक आलं तो माझा सर्वात आनंदी दिवस होता. मला अजूनही पुस्तकाचा वास आठवतोय. 

आज आपल्यातील काही स्पेशल फिल्ममेकर्स ज्यांनी कल्की, बाहुबली, रामायण सारखे सिनेमे केले यात माझ्या वडिलांचाही समावेश आहे ज्यांन कोई मिल गया, क्रिश बनवला अशा लोकांमध्ये काहीतरी नवीन करण्याचं धाडस आहे. हे सगळं सिनेमावरील प्रेमामुळे आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेलं असं काहीतरी त्यांना अनुभवायला मिळतं. माझ्या मते हे फिल्ममेकर्स आर्थिक रिस्क घेतात आणि वर्षानुवर्ष मेहनत घेतात जेणेकरुन माझ्यासारखंच एखाद्या ११ वर्षांच्या मुलालाही असं काहीतरी अनुभवायला मिळेल. माझ्यासाठी हेच नोबल आहे आणि मला याचा अभिमान आहे. मला यांच्यासोबत अगदी असिस्टंट म्हणूनही सहभागी व्हायला आवडेल. 

पण ही पोस्ट माझ्यासाठी नाही तर प्रेक्षकांसाठी आहे. आपले हजारो कलाकार अनेक वर्ष दिवस रात्र मेहनत करुन व्हीएफएक्स  हेवी फिल्म्स बनवतात. आपण किमान त्यांना पाठिंबा तर देऊ शकतो." शेवटी हृतिकने 'सिनेमा पाहण्याआधीच तर्क लावू नका' असाही सल्ला प्रेक्षकांना दिला

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hrithik Roshan reacts to 'Ramayan' VFX criticism, shares personal story.

Web Summary : Hrithik Roshan responded to VFX criticisms of 'Ramayan,' recalling his childhood fascination with special effects after watching 'Back to the Future.' He praised Indian filmmakers for their daring cinematic endeavors, urging support for their creative efforts.
टॅग्स :हृतिक रोशनरणबीर कपूररामायण सिनेमाबॉलिवूड