Join us

​‘कॉफी विद करण’मध्ये हजेरी लावणार हृतिक रोशन; पण कोण असेल त्याच्या सोबत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 22:11 IST

बॉलिवूड सेलिब्रेटींची पोलखोल करणारा शो म्हणून ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होते. बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांत सामील असलेला ...

बॉलिवूड सेलिब्रेटींची पोलखोल करणारा शो म्हणून ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होते. बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांत सामील असलेला करण जोहर हा शो होस्ट करीत असल्याने बहुतेक कलावंत या शोमध्ये जाण्यास उत्सुक असतात. ‘कॉफी विद करण ५’मध्ये हृतिक रोशन हजेरी लावणार असल्याच्या बातम्या येत असून त्याच्यासोबत या कार्यक्रमात कुणाची जोडी जमणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी बॉलिवूड स्टार उत्सुक असतात यामागे बॉलिवूडमधील या दिग्गजाला कोण नकार देऊ शकेल असाही समज आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलावंतानी हजेरी लावली आहे. ‘काफी विद करण’च्या पाचव्या सिजनमध्ये लवकरच हृतिक रोशन हजेरी लावणार आहे. हृतिक रोशन म्हणाला, होय नक्कीच मी कॉफी विद करणमध्ये हजेरी लावणार आहे. मात्र सध्याच काही सांगता येत नाही. हृतिकचे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आणखी एक कारण आहे. हृतिकचा आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. सध्या तो ‘काबिल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामुळे तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो अशी शक्यता आहे. मात्र त्याच्यासोबत कोण हजेरी लावणार हे गुपित कायम आहे. ‘काफी विद करण’मध्ये हृतिक सोबत यामी गौतमी हजेरी लावणारे हे नाव आपसुकच समोर येते. मात्र हृतिकसोबत यामी हजेरी लावणार नाही असे सांगण्यात येत आहे. हृतिकसोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ हजेरी लावणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. ‘काफी विद करण’च्या या सिजनमध्ये कॅटरिना हजेरी लावणार अशा चर्चा केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा यांनी करणच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी ती पुन्हा एकदा हजेरी लावणार असा उल्लेख करण्यात आला होता. मागील काही दिवसांत कॅटरिना कैफ हृतिक रोशनसोबत ‘काफी विद करण’मध्ये हजेरी लावणार अशा चर्चा होत्या.