‘ठग’साठी हृतिकने आकारले होते ६० कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 09:56 IST
यशराज फिल्म्सचा ‘ठग’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे. त्यात मुख्य अभिनेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
‘ठग’साठी हृतिकने आकारले होते ६० कोटी?
यशराज फिल्म्सचा ‘ठग’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे. त्यात मुख्य अभिनेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हृतिक रोशनऐवजी आता आमीर खान याला घेण्यात आले आहे. पण, हृतिकने हा चित्रपट का सोडला? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे.प्रथम हृतिक रोशनशी चित्रपटाविषयी बोलण्यात येत होते. मात्र, त्याने दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांना ६० कोटी रूपये फीस मागितली. पण ही फीस आदित्य चोप्रा यांना खुप जास्त वाटली. त्यांनी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही.सुत्रानुसार,‘ शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान हे निर्मात्यांना तसे फीसच्या दृष्टीकोनातून परवडणारे कलाकार आहेत. मात्र, हृतिकला एकट्यालाच ६० कोटी रूपये हवे होते. कारण, चित्रपटाने जर बॉक्स आॅफीसवर चांगला गल्ला कमावला तर त्यातील काही टक्के शेअर कलाकाराला मिळत असतो.पण, या चित्रपटाचे कथानक एवढे दर्जेदार आहे की, बॉक्स आॅफिसवर चांगलीच धूम करणार हे हृतिकला माहित होते. मात्र, आता आमीर खानच हा चित्रपट त्याच्या नेहमीच्या रेटनुसार हा चित्रपटही करणार आहे.