Join us

हृतिक-दीपिका येणार पडद्यावर एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:59 IST

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या बातमीने या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांचा ...

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रथमच एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या बातमीने या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.हे दोघेही गुणी कलावंत पडद्यावर एकत्र पाहणे हा नक्कीच आनंददायी अनुभव असेल. आतापर्यंत या दोघांनी एकत्र कामच केलेले नाही. साजिद नाडियाडवालांनी मात्र त्यांना एकत्र आणण्याचे ठरवले आहे. सैफ अली खान आणि करिना कपूरच्या ‘फॅण्टम’ या चित्रपटानंतर साजिदनं दिग्दर्शक कबीर खानसह दीपिका आणि हृतिक यांना घेऊन चित्रपट करण्याचा संकल्प केला आहे.साजिद दीपिकाचे काम पाहून भारावून गेला आहे. यापूर्वी तिच्यासह काम करण्याची साजिदची इच्छा या ना त्या कारणाने राहिली होती. आता मात्र आपल्या आगामी प्रकल्पात हृतिकसह दीपिकालाच घेऊन चित्रपट करण्याचे त्याने ठरवले आहे.