Join us

ऋतिकच्या जीवनात अखेर परतणार सुखाचे क्षण, 'ती' आणि तो पुन्हा एकत्र......

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:31 IST

दोघांनीही लग्न केले. पण १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अचानक दोघांनीही घटस्फोट घेतला होता.

ऋतिक रोशन आणि सुजैन खान याचा घटस्फोट झाला असला तरीही दोघे एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.अधून मधून ते बिझी शेड्युअलमधून वेळ काढून आपल्या एकमेकांना वेळ देतात.नुकतेच दोघेही सिनेमा पाहण्यासाठी एकत्र एक गेले होते. त्यावेळी मीडियाच्या कॅमे-यात दोघे कैद झाले. हृतिक रोशन  ब्‍लॅक हूडी आणि कैप मध्ये दिसला. तर सुजैनने कॅजुअल वेस्‍टर्न डेनिम आउटफिट घातला होता. याधीही दोघे मुलांबरोबर एकत्र पाहायला मिळाले होते. ऋदान आणि ऋहान ही अशी मुलांची नावं आहे. यावरून दोघांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या मध्ये घट्ट मैत्री आहे. एक मुलाखती दरम्यान सुझैनने ऋतिक आणि तिच्यामध्ये चांगले बॉन्डिंग असल्याचे सांगितले होते.  

दिलेल्या मुलाखतीत सुजैनने सांगितले होते की, ''आम्ही कपल नसलो तरी आमच्यामध्ये मैत्रीचे नातं आजही कायम आहे. ऋतिक माझा सपोर्ट सिस्टम आहे. आम्ही एकत्र राहत नसलो तरी एकमेकांसाठी नेहमीच मदतीला उभे येतो.'' हृतिक व सुजैनची लव्ह स्टोरी प्रचंड शानदार होती. दोघांनीही लग्न केले. पण १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अचानक दोघांनीही घटस्फोट घेतला. 

हृतिकसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही सुजैनने सांगितले होते की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लॉस एंजिल्सला गेले. तिथून परत आल्यावर मला एक सुपरस्टार तरूण भेटला. तो त्यावेळी सुपरस्टार नव्हता. पण माझ्या नजरेत तो सुपरस्टार होता. नशीबाने मला पुन्हा त्याच फिल्मी दुनियेत आणले, असे सुजैन म्हणाली.

एकेकाळी हृतिक रोशनसुजैन खान हे  बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी  एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. 

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन