कसे असेल संजय दत्तचे करिअर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:16 IST
अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी कारावास भोगणारा संजय दत्त कायमस्वरूपी एक फ्रीमॅनच्या रूपात बाहेर फेब्रुवारीच्या शेवटी पुणे जेलमधून बाहेर येईल. कदाचित ...
कसे असेल संजय दत्तचे करिअर ?
अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी कारावास भोगणारा संजय दत्त कायमस्वरूपी एक फ्रीमॅनच्या रूपात बाहेर फेब्रुवारीच्या शेवटी पुणे जेलमधून बाहेर येईल. कदाचित ही त्याच्या जीवनाची नवी सुरुवात असेल. बॉलिवूडमध्ये त्यांच्या मित्रांनी खास जल्लोषाची तयारी सरू केली आहे. सर्वांना संजूच्या आगमनाची उत्सुकता असेल. स्वाभाविकच यावेळी कारागृहातून बाहेर आल्यावर संजय दत्त आपल्या करिअरची नवी इनिंग सुरू करतील. संजय दत्तचे पहिले लक्ष्य राजकुमार हिरानीचा चित्रपट असेल असे सांगण्यात येते. राजकुमार हिरानी संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट तयार करीत असून रणबीर कपूर यात प्रमुख भूमिका करीत आहेत. या चित्रपटासाठी हिरानी संजयची वाट पाहत आहेत. संजयच्या आगमनानंतरच या चित्रपटाला सुरुवात करण्याची त्यांची इच्छा आहे. संजय यात सूत्रधाराची भूमिका करतील. विंधू विनोद चोपडा देखील संजूची वाटच पाहत आहेत, मुन्नाभाई सिरिजच्या तिसर्या चित्रपटावर काम सुरू करण्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे.वापसीनंतर संजयचे करिअर कसे असेल. कोणत्या प्रकारच्या चित्रपटात तो कशा भूमिका करेल. संजय दत्तचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. ज्यात डेविड धवनसोबत 'रास्कल' हा चित्रपट बनविला आहे. राजकुमार हिरानी आणि प्रभुदेवा यांना संजय दत्तने आपल्या प्रोडक्शन मध्ये चित्रपट बनविण्यासाठी साइन केले असल्याचे सांगण्यात येते. बातमी अशीही आहे की करण जाैहरच्या कंपनीत संजय दत्त वर आधारित चित्रपट तयार होईल. असे संकेत करण जाैहरने बर्याचदा दिले आहेत. शिवाय करण जाैहर संजय दत्त परतल्यानंतर शुद्धीवर काम सुरू करू शकतात. संजयचा मित्र संजय गुप्तादेखील आपल्या जून्या मित्रासोबत चित्रपट बनविण्याचे संकेत दिले आहेत.