अजून किती दिवस ‘अबोला’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 11:26 IST
लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सध्या मोरोक्कोत ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या सेटवरील अनेक ...
अजून किती दिवस ‘अबोला’ ?
लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सध्या मोरोक्कोत ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओज लीक झाले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व काही व्यवस्थित आहे फक्त ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत आणि पहिल्यासारखे रिअॅक्टही करत नाहीत.मात्र, चाहते ते पुन्हा एकत्र येण्याची वाट पाहत आहेत. पण, तसे काहीही होणार असे दिसतेय. त्यांच्या ‘पॅच-अप’ ची कुठलीच चिन्हे दिसत नाहीयेत. मोरोक्कोत थोडे शूटिंग झाले असून काही शूटिंग बाकी राहिलेले आहे.मात्र, या पोस्ट शूटिंगमध्येही ते दोघे एकमेकांना बोलतील असे काही वाटत नाही. चित्रपटाचे शेड्यूल संपल्यानंतर रणबीर मुंबईला जाणार असून कॅट लंडनला तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार आहे.