Join us

स्वतःला कशी फिट ठेवते ऐश्वर्या?; जाणून घ्या तिचा हा फिटनेस फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:00 IST

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण त्यानंतर तिनं हे वाढलेलं वजन घटवलं आहे.

बॉलिवूड फिल्म इडंस्ट्रीमध्ये अनेक असा सेलिब्रिटी आहेत ज्या आपल्या अॅक्टिंगसोबतच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. या यादीमध्ये ऐश्वर्याचाही समावेश होतो. त्यात ऐश्वर्याचं विशेष कौतूक करायला पाहिजे कारण बाळंतपणानंतर तिचे वजन वाढलं होतं. मात्र तिनं हे वाढलेलं वजन घटवलं आणि ती पुन्हा स्लिम ट्रिम झाली. स्लिम ट्रिम होण्यासाठी जाणून घ्या तिचा हा फिटनेस फंडा.

ऐश्वर्याला जिममध्ये जायला फारसं आवडत नाही. तरीही ती आठवड्यातून दोनदा जिममध्ये जाते.

ऐश्वर्या रोज 45 मिनिटं पाॅवर योगा करते. याशिवाय ती चालण्याचा व्यायाम करते. शिवाय जाॅगिंगही करते.

ऐश्वर्या काळजीपूर्वक डाएट करते. सकाळी उठल्या उठल्या ती लिंबू सरबत, मध पाण्यात टाकून पिते. ब्रेकफास्टला ती ओट्स खाणं पसंत करते.

जेवणात ती उकडलेल्या भाज्या, चपाती आणि डाळ घेते. तिला हे तीन पदार्थ खूप आवडतात.

डिनरला ऐश्वर्या ब्राऊन राईस आणि मासे खाते. डिनर ती हलका घेते.

ऐश्वर्या जंक फुड अजिबात खात नाही. रोज ८ ग्लास पाणी पिणं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय ती फळं, ज्युस जास्त घेते. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन