1.सनी लिओनीचे खरे नाव करनजीत कौर वोरा. पेंटहाऊस या पुरुषांच्या एडल्ट मॅगझिनसाठी तिने पहिल्यांदा काम केलं तेव्हापासून सनी लिओनी हे नवं नाव तिला मिळालं.
2.एडल्ट इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी लहान मुलांची नर्स बनण्याचं सनी शिक्षण घेत होती. मात्र वयाच्या 19 व्या वर्षी तिने एडल्ट इंडस्ट्रीमध्ये एंट्री मारली
3.वयाच्या 18व्या वर्षी बायसेक्स्युअल असल्याचं कळलं.
4. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी सनीने जिफी ल्यूब या जर्मन बेकरीमध्ये काम केलं होतं.
5. 'कलयुग' या सिनेमातून सनी बॉलीवुडमध्ये एंट्री मारणार होती. मात्र एक कोटी डॉलरच्या आर्थिक अपेक्षेमुळे तिचे बॉलिवुड पदार्पण लांबणीवर पडलं. मात्र सात वर्षानंतर सनीने जिस्म 2 सिनेमातून बॉलीवुडमध्ये प्रवेश केला.
6. भारतीय टेलिव्हिजनवर सनीचे दर्शन रसिकांना 2005 साली झालं. एमटीव्ही इंडियाच्या एमटीव्ही अवॉर्ड्स सोहळ्यात ती रेड कार्पेट रिपोर्टर बनली होती.
7. सनी लिओनी ही पहिली पॉर्न स्टार आहे जिने बॉलिवुड सिनेमात एंट्री केली.
8. भारतात काम सुरु करण्याआधी फिरण्याची आवड असलेली सनी चार वेळा भारतात आली होती.
9. मॅक्झिम या पुरुषांच्या मॅगझिनेने सनीला 2010 मध्ये टॉप 12 लेडी पॉर्न स्टारमध्ये स्थान दिलंय.
10.पेंटहाऊस कव्हर ऑफ इयर आणि एक लाख डॉलर जिंकल्यानंतर आपल्याला पॉर्न स्टार बनायचं असल्याचं आपल्या पालकांना सांगितले होते असा खुलासा सनीने एका मुलाखतीमध्ये केला होता.
11. एडल्ट इंडस्ट्रीमध्ये सनीने बरेच काम केलं आहे. तिने 42 एडल्ट सिनेमांचं दिग्दर्शन केलंय तर 41 सिनेमात ती स्टार म्हणून झळकलीय. सध्या तिने आपले सारं लक्ष बॉलिवुड अभिनेत्री बनण्यावर केंद्रीत केलंय. असं असले तरी नजीकच्या भविष्यात बॉलीवुड सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल ठेवण्याचाही तिचा मानस आहे.
12. रडण्याचा सीन करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर कसा करावा हे जिस्म-2 सिनेमाच्या शुटिंगवेळी सनी शिकलीय.
13.सनीने एकता कपूरचा हॉरर सिनेमा रागिनी एमएमएस-टूमध्ये भूताची भूमिका साकारली होती. मात्र रिअल लाइफमध्ये भूताला घाबरत नसल्याचे सनीने सांगितले किंवा भूताशी रिअलमध्ये आमना झाला नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. मात्र सेक्सी हॉट बेब सनी किडे आणि किटक यांना प्रचंड घाबरते. याबद्दल सनीच्या मनात बराच फोबिया आहे.
14.बॉलिवुड सिनेमासह प्रादेशिक सिनेमातही सनीचा जलवा पाहायला मिळतोय. सनीने दाक्षिणात्य सिनेमातही एंट्री केली. मे 2014 मध्ये 'वड्डाकरी' या तामिळ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत सनीने दाक्षिणात्य सिनेमात पाऊल ठेवले.
15.याशिवाय सनीने डीके या कन्नड सिनेमातील 'सीसम्मा बगिलू' या आयटम साँगमध्येही सनी थिरकली. या माध्यमातून सनीने कन्नड सिनेमातही पाय रोवण्याचा प्रयत्न केला.
16.मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान हा सनीचा बॉलीवुडमधील फेव्हरेट अभिनेता आहे. दिल सिनेमापासून ती आमिरची फॅन आहे.
17. प्ले बॉयचा उपाध्यक्ष मॅट एरिक्सनसोबत सनीची एन्गेजमेंट झाली होती. मात्र 2008 साली दोघंही विभक्त झाले.
18.प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअन रसेल पीटरसोबतही सनीचे अफेअर गाजले. 2008 मध्ये दोघंही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. मात्र 2011 साली डॅनिअल वेबरसह लग्न केल्याचं सनीने जाहीर केले. एडल्ट इंडस्ट्रीमध्ये डॅनिअल हा सनीचा कोस्टार आणि सहनिर्माता होता.
19. सनीला निरोगी आणि सुदृढ बाळ हवंय असे तिने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होते. डॅनिअलला एक सुंदर परी हवीय आणि मला एक गोड निरोगी बाळ मग ते मुलगी असो किंवा मुलगा असं सनीने सांगितले. मात्र ते कधी हे सनी सांगू शकत नसले तरी लवकरच हे तिने आवर्जून सांगितले.
20.सनी प्राणी प्रेमी असून पेटा या सामाजिक संस्थेसाठी निधी उभारण्याचे काम ती करते. लिलू आणि चॉपर नावाच्या प्राण्यांचं ती संगोपन करते.