शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान', 'डंकी' या तीन सिनेमांमधून शाहरुखने वर्ष गाजवलं. शाहरुख कायमच नव्या पिढीतील अभिनेत्यांनाही प्रोत्साहन देत असतो. कालच वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यावेळी शाहरुखने ट्रेलर पाहून त्याचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला शाहरुख?
बेबी जॉनचा ट्रेलर पाहून शाहरुख काय म्हणाला?
शाहरुखने ट्विटरवर पोस्ट लिहून खुलासा केलाय की, "किती शानदार ट्रेलर आहे. खरंच खूप चांगलं काम केलंय. हा सिनेमा बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कलीस तुझा बेबी जॉन हा सिनेमा तुझ्यासारखाच ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल. एटली आता निर्मात्याच्या भूमिकेत यशस्वी होईल ही आशा. वरुण धवन तुला या अंदाजात बघून खूप छान वाटलं. जग्गू दा तुम्ही खूप खतरनाक वाटत आहात. कीर्ती सुरेश, वामिका गब्बी अन् संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. हा सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंटचं संपूर्ण पॅकेज आहे."
बेबी जॉन कधी रिलीज होणार?
आजवर वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. २५ डिसेंबर २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'बेबी जॉन'चा काल रिलीज झालेला ट्रेलर एकदम हटके असून अल्पावधीत लोकांनी या ट्रेलरला पसंती दिलीय. आता वरुण धवन आणि जॅकी श्रॉफ हे दोघे बॉक्स ऑफिसवर काय धमाका करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. याशिवाय सिनेमात सलमान खानही विशेष भूमिकेत दिसणार आहे.