Hotness : प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोननंतर दिशा पटनी दिसली ब्रा लेस ड्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:34 IST
नुकत्याच झालेल्या ग्लोडन ग्लोब अवॉर्डमध्ये बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा ही ब्रा लेस ड्रेसमध्ये दिसली होती. ग्लोडन रंगच्या या ...
Hotness : प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोननंतर दिशा पटनी दिसली ब्रा लेस ड्रेसमध्ये
नुकत्याच झालेल्या ग्लोडन ग्लोब अवॉर्डमध्ये बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा ही ब्रा लेस ड्रेसमध्ये दिसली होती. ग्लोडन रंगच्या या ड्रेसमध्ये प्रियंका अतिशय हॉट अॅण्ड सेक्सी दिसत होती. प्रियंकाच्या या ड्रेसची हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा रंगली. प्रियंकाच्या या सेक्सी लूकची चर्चा होऊन २४ तासही उलटत नाही तोच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोन हिने काहीसा असाच ग्लोडन कलरचा ब्रा लेस ड्रेस परिधान करून धूम उडवून दिली. विन डिझेल त्याच्या ‘एक्सएक्सएक्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला असता, त्याच्यासोबत असलेल्या दीपिकाने माध्यमांचे लक्ष त्याच्याऐवजी स्वत:कडे वळविले. दस्तुरखुद्द विन डिझेलही दीपिकाच्या या स्टाइलवर फिदा झाला होता. या ड्रेसमुळे दीपिकाची नेकलाइन स्पष्टपणे दिसत असल्याने माध्यमांमध्ये तिची ही स्टाइल विशेष चर्चिली गेली. त्यानंतर सोशल मीडियावरही या ड्रेसमधील दीपिकाचे फोटो व्हायरल झाले होते. ब्रा लेस असलेल्या या ड्रेसमध्ये दीपिकाचा सौंदर्य जबरदस्त खुलून दिसत होते. यापूर्वीदेखील दीपिकाने एमा अवॉर्डमध्ये अशाप्रकारचा ब्रा लेस ड्रेस घातला होता. आता या दोघीनंतर दिशा पटनी काहीशा अशाच ब्रा लेस ड्रेसमध्ये तिच्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. जॅकी चॅन ‘कुंग फू योगा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला असता, दिशा त्याच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसली. ब्रा लेस ड्रेस परिधान केलेल्या दिशाने हॉटनेसचा अक्षरश: तडका लावला होता. या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्यं जबरदस्त खुलून दिसत होते. सध्या बॉलिवूड अॅक्ट्रेसकडून ब्रा लेस ड्रेसची स्टाइल फॉलो केली जात असून, त्यामध्ये त्यांचा लूक जबरदस्त हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहे.