Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness : जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाने असा दाखविला ‘सीक्रेट टॅटू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 20:34 IST

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा भलेही ग्लॅमर दुनियेपासून दूर राहणे पसंत करीत असली तरी, ती बी टाउनमध्ये सर्वात पॉप्युलर ...

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा भलेही ग्लॅमर दुनियेपासून दूर राहणे पसंत करीत असली तरी, ती बी टाउनमध्ये सर्वात पॉप्युलर स्टार डॉटर्स आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, ज्यामध्ये ती सीक्रेट टॅटूज दाखविताना दिसत आहे. या अगोदरदेखील कृष्णाने नोव्हेंबर २०१६ मध्ये असाच एक स्विमिंग पुलात आंघोळ करतानाचा बिकिनी फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा फोटो शेअर केल्याने, कृष्णा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली कृष्णा त्यावेळेस चर्चेत आली होती जेव्हा तिने टॉपलेस फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर केले होते. आतापर्यंत कृष्णाला अनेक सिनेमांच्या आॅफर्स आल्या आहेत, मात्र अभिनयात फारशी रूची नसल्याने तिने यासर्व आॅफर्स नाकारल्या आहेत. अशातही ती तिच्या हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटोशूटमध्ये चर्चेत असते. यापूर्वी जेव्हा तिने टॉपलेस फोटोशूट केले होते, तेव्हा त्यातील एका फोटोत तिची न्यूड बॅक दिसत होती. तिचे हे फोटो ‘टॉपलेस पोज’ या टॅगने व्हायरल झाले होते. ज्यामुळे कृष्णा काहीसी नाराज झाली होती. मात्र तिचा हा हॉट अंदाज बॉलिवूडलाही भावला आहे. त्यामुळे करण जोहरने तिला ‘स्टूडेंट आॅफ द ईयर’ या सिनेमाची आॅफर दिली होती. मात्र अभिनयापासून दूर राहण्याचा जणू काही संकल्पच केलेल्या कृष्णाने करणला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. कृष्णाच्या नकारामुळे ही भूमिका आलिया भट्टला मिळाली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ब्राजीलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसन याच्याबरोबरचे काही फोटोज् शेअर केल्यानेही कृष्णा चर्चेत आली होती. वास्तविक स्टार किड्स आपले अफेयर अशाप्रकारे जगजाहीर करीत नाहीत, मात्र कृष्णा यास अपवाद असून, अफेयर ओपन ठेवण्यावर ती अधिक विश्वास ठेवते. फुटबॉल ट्रेनर असलेल्या स्पेंसरला कृष्णाचा संपूर्ण परिवार ओळखत असून, त्याच्यासोबतच्या संबंधाला अद्यापपर्यंत कोणीही विरोध केलेला नाही.