Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert : शमा सिकंदर म्हणते, मी पॉर्न फिल्म्स बघितल्याचे कधीच म्हटले नव्हते...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 15:50 IST

आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदर ही ‘माया’ या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ...

आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदर ही ‘माया’ या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शमाने ‘सेक्सहॉलिक’ नावाची एक शॉर्ट फिल्म काही महिन्यांपूर्वी केली होती. या शॉर्ट फिल्मसाठी तिने खऱ्या पॉर्न फिल्म्स बघितल्याचे म्हटले जात होते. मात्र, शमाने या वृत्तास आता धुडकावून लावले आहे. लोकांनी अशाप्रकारचा गोंधळ केल्यामुळे नसते वाद उद्भवतात असे शमाचे म्हणणे आहे. ही अभिनेत्री लोकांशी मोकळेपणाने बोलण्यात विश्वास ठेवते. पण, जेव्हा आपल्या एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने समोर आणले जाते तेव्हा दु:ख होते असेही तिचे म्हणणे आहे. शमा असेही म्हणते की, माझ्या वक्तव्यास चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे. मी साकारलेल्या भूमिकेसाठी रिसर्च करण्याकरिता पॉर्न फिल्म्स बघितल्याचे कधीच म्हटले नव्हते. खरंतर मी जी व्यक्तिरेखा साकारणार होते ते समजून घेण्यासाठी स्क्रिप्ट आणि विज्युअल कन्टेटची मागणी केली होती. पण, या सगळ्यात पॉर्नोग्राफी कधीच नव्हती. सेक्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर ही शॉर्टफिल्म आधारित होती. यासाठी मला देण्यात आलेले मटेरियल रंजक होते.भारतातील प्रेक्षक यांसारख्या शॉर्ट फिल्म्सना कशा पद्धतीने प्रतिसाद देतात त्यावर बोलताना शमा म्हणाली की, ज्या प्रकारचा प्रतिसाद ‘सेक्सहॉलिक’ आणि माझ्या आताच्या वेब सिरीजला मिळत आहे ते पाहता भारतीय प्रेक्षकांनी त्यास स्वीकारल्याचे दिसते. पॉर्न इंडस्ट्री ही केवळ भारतातच नाही तर जगभरात पैसा कमवत आहे. डिजिटल बूमच्या या युगात तुम्ही कोणालाच काहीही वाचण्यापासून किंवा बघण्यापासून रोखू शकत नाही. याव्यतिरीक्त शमा लवकरच विक्रम भट्ट दिग्दर्शित चित्रपटात काम करणार असल्याचेही म्हटले जातेय. त्यावर बोलताना शमा म्हणाली की, माज्याकडे चित्रपटाच्या आॅफर आहेत. पण, मला यावर बोलण्याची परवानगी नाही. याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल.