Join us
Daily Top 2Weekly Top 5

​Hot song : जरीन खानचे हे गाणे टीव्हीवर दाखवायच्या लायकीचे नाही, सेंसॉर बोर्डाचा दणका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 13:35 IST

त्यातील हॉट सीन पाहता सेंसॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेत हे गाणे टीव्हीच्या दर्शकांसाठी अनुचित असल्याचे सांगितले.

सध्या अक्सर-२ हा चित्रपट त्यातील हॉट सीनमुळे खूप चर्चेत आहे. त्यात नुकतेच ‘आज जिद’ हे गाणे रिलीज करण्यात आले. मात्र त्यातील हॉट सीन पाहता सेंसॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेत हे गाणे टीव्हीच्या दर्शकांसाठी अनुचित असल्याचे सांगितले. पहलाज निहलाणीनंतर गीतकार आणि अ‍ॅड गुरू प्रसुन जोशी यांनी सेंसॉर बोर्डाची धुरा सांभाळली. त्यांच्या टीमने कामदेखील सुरु केले आहे. जरीन खानचा चित्रपट ‘अक्सर-२’मधील ‘आज जिद’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सेंसॉरने लगेच त्यावर आक्षेप नोंदविला. सेंसॉरच्या या निर्णयावर दु:खी होऊन चित्रपटाचे डायरेक्टर अनंत महादेवन यांनी सांगितले की, ‘आज जिद’ हे गाणे खूप मेलॉडियस आहे आणि मला समजत नाही की, सेंसॉर बोर्डाला यात काय आणि कसे अनुचित दिसत आहे.’ या गाण्याचा मात्र यूट्युबवर एक करोड व्यूज मिळाले आहेत.    त्यांनी पुढे सांगितले की, ‘जेव्हा आम्ही चित्रपटाच्या या ट्रॅकवर काम करीत होतो, मोहम्मद रफी साहेब यांनी गायलेले गाणे आणि संजिव कुमारवर चित्रित करण्यात आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटाचे गाणे, तुमसे कहुँ इक बार... याचा संदर्भ घेतला. दिवंगत संगीतकार मदन मोहन यांनी या गाण्याचा ट्रॅक बनविला होता. मला असे वाटते की, ‘अक्सर-२’ चे ‘आज जिद’ या गाण्यात अश्लिल असे काही नाही. गाण्याला चित्रपटांच्या संदर्भात पाहायला हवे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. आशा करतो की, बोर्डाच्या सदस्यांनी निर्णयावर पुन्हा विचार करावा. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये या गाण्याचे खूप महत्त्व आहे. या चित्रपटाचे म्युझिक मिथूनने कंपोज केले आहे आणि हा चित्रपट ६ आॅक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.